Home महाराष्ट्र एक मार्चला प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांचे व्याख्यान- माजी आमदार राजीव आवळे...

एक मार्चला प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांचे व्याख्यान- माजी आमदार राजीव आवळे यांचा नागरी सत्कार

128

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कोल्हापूर(दि28फेब्रुवारी):- “निमित्त वाढदिवसाचे… प्रबोधन जनतेचे” या निर्मिती विचारमंचचा उपक्रमा अंतर्गत परिवर्तनवादी चळवळीचे राजकिय नेते माजी आमदार राजीव आवळे यांच्या वाढदिवसानिमित्त… माजी आमदार राजीव आवळे यांचा नागरी सत्कार आणि सुप्रसिद्ध लेखक व विचारवंत प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांचे कुळवाडी कुळभूषण, बहुजन प्रतिपालक, लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर मंगळवार दि. 1 मार्च, 2022 रोजी सायं. 5:30 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या नागरी सत्कार व जाहीर व्याख्यान अशा संयुक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. अमर कांबळे असून ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. रघुनाथ कांबळे आणि ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर यांच्या हस्ते सत्कार माजी आमदार राजीव आवळे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे निमंत्रक सेक्युलर सोशल फ्रंटचे अध्यक्ष अनिल म्हमाने आणि बहुजन रयत परिषदेचे नेते अब्राहमबापू आवळे हे आहेत.सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रण अनिल म्हमाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here