




✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.28फेब्रुवारी):-श्री जैन सेवा समिती द्वारा संचालित विद्यानिकेतन दादावाडी चंद्रपूर येथे महान वैज्ञानिक सि.व्ही. रमण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विज्ञान दिनाचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी सिबीएससी विभागाच्या प्राचार्य सौ. सपना पिट्टलवार तसेच स्टेट बोर्ड विभागाच्या प्राचार्य राजश्री गोहोकार , सौ. निशा यांच्या उपस्थितीत वैज्ञानिक सि.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी विज्ञान विभागाच्या सौ. सिमा जवळे यांनी सि.व्ही. रमण यांच्या जीवनावर प्रकाश टाकत विज्ञानाचे मानवी जीवनात असलेले महत्त्व यासंबंधी विस्तृत माहिती दिली. सदर कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. शाळेचे अध्यक्ष राज रणजितजी पुगलिया यांचे मार्गदर्शन लाभले. कोरोना नियमाचे पालन करत छोटेखानी स्वरूपात कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.




