



🔸जनतेंनी प्रशासनाचं लक्ष वेधण्याची गरज
✒️सुनील शिरपुरे(झरीजामणी प्रतिनिधी)
झरीजामणी(दि.28फेब्रुवारी):-हे तालुक्याचं मुख्यालय आहे. त्यामुळे अष्टदिशातून हजारो लोकांचे या ना त्या कामानिमित्य दररोज येणे-जाणे असते. परंतु या तालुक्याला जाणारा अष्टदिशातील एकही रस्ता सुस्थितीत नाही. रस्त्यांचा पूर्णत: तिनतेरा वाजला आहे. लोकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या रस्त्यांच्या दुर्दशामुळे जठरातील आतळ्यांची गुंतागुंत होते आणि पोटाचे विकार उद्भवतात. चांगल्या लोकांची ही स्थिती होत असतील, तर रुग्णांची अवस्था काय असेल? याचा अंदाज न लावलेलाच बरा! त्यातही समजा एखाद्या गरोदर स्त्रीला किंवा अतित्रासदायक रुग्णाला शासकीय रुग्णालयात घेऊन जाताना त्या रुग्णाची कंडिशन तर सांगायलाच नको? अशी या तालुक्याच्या तोकड्या रस्त्याची दयनिय अवस्था आहे. यामुळे अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. छोटे-मोठे अपघात तर अगणनीय आहे.
परंतु या रस्त्यांकडे प्रशासनाचं लक्षच नाही. या रस्त्याने पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दौरा केला. त्यांच्या डोळ्यासमक्ष सर्व वास्तविक परिस्थिती गेली. तरी पण प्रशासनाचं या रस्त्याकडे डोळेझाकपणे दुर्लक्ष होत आहे. अद्यापही या रस्त्यांची दखल घेतल्या गेली नाही. तरी प्रशासनाने या रस्त्यांची दखल घेण्यासाठी जनतेंनी ठोस पाऊले उचलायला हवी. तेव्हा कुठे प्रशासनाचं लक्ष वेधल्या जाईल. अन्यथा जैसे थेच परिस्थिती राहील व आपल्या जीवाचा खेळखंडोबा होईल यात काही शंकाच नाही.


