Home बीड बीडमध्ये मोटरसायकल शोरुमला भीषण आग; लाखो रुपयांच्या नव्या कोऱ्या मोटरसायकल आगीत जळून...

बीडमध्ये मोटरसायकल शोरुमला भीषण आग; लाखो रुपयांच्या नव्या कोऱ्या मोटरसायकल आगीत जळून खाक

68

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.28फेब्रुवारी):-बीडमध्ये मोटरसायकल शोरुमला भीषण आग लागली आहे. या आगीत लाखो रुपयांच्या नव्या कोऱ्या बाईक्स जळून खाक झाल्या आहेत.बीड शहरात हे हिरो मोटरसायकल शोरूमसह गोदामाला भीषण आग लागली आहे. आज रविवारचा दिवस असल्याने सुदैवाने यामध्ये कर्मचारी कार्यरत नव्हते, मात्र आगीची माहिती मिळताच मालकाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

अखेर बीड अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या आगीत लाखोंच्या नवीन मोटारसायकली जळून खाक झाल्या आहेत.दरम्यान याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरल्यानं बघ्यांची मोठी गर्दी होत आहे. आग एवढी भीषण असून गोदामासह शोरूम मध्ये देखील पसरली आहे. परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

Previous articleपरळी रेल्वे स्थानकातून काही महिन्यात धावणार विजेचे इंजिन
Next articleमहाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती नाशिक जिल्हा अध्यक्षपदी शांताराम महाराज दुसाने यांची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here