




✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
परळी(दि.28फेब्रुवारी):- रेल्वे स्टेशन तसे सिकंदराबाद डिव्हिजन चे शेवटचे स्थानक असले तरी तेथून लगेच नांदेड डिव्हिजन ही सुरू होते. परळी रेल्वे स्टेशन हे रेल्वेच्या दोन डिव्हिजन चे केंद्रबिंदू आहे. सिकंदराबाद डिव्हिजन आणि नांदेड डिव्हिजन या दोन्ही डिव्हिजन चा प्रभाव येथे प्रामुख्याने दिसून येतो.सध्या रेल्वेच्या विद्युतीकरनाच्या कामने वेग घेतला असून नांदेड विभागाकडून येणारी परभणी – परळी दरम्यान चे रेल्वे लाईन लगत वीज खांब उभारणे आणि केबल टाकने जवळपास पूर्णत्वास जात आहे.
रेल्वेचा आपल्या पद्धतीने आणि त्या अनुषंगाने स्थानकाचा, परिसराचा विकास सातत्याने सुरू असतो. सध्या मराठवाड्यात रेल्वेची विद्युतीकरण मोठ्या प्रमाणात होत असून, याचा फायदा या भागातील प्रवासी नागरिकांना होणार आहे.डिझेल इंजिनची धडधड आता बंद होऊन इलेक्ट्रिकल लोकोमोटिव्ह या मार्गावर धावू लागतील. परभणी ते परळी हे सुमारे ६४ किलोमीटरचे अंतर असून या मार्गाचे विद्युतीकरणाचे काम २०२० ला सुरू झाले होते.यात ३१ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून आता पोखरणी ते वडगाव निळा या मार्गावर मोठ्या प्रमाणात काम झाले आहे. परळी शहराजवळील सिमेंट उत्पादन करणार्या कंपनी पर्यंत विद्युतीकरणाचे खांब उभा राहिले आहेत.




