Home बीड जिल्हाप्रशासनाच्या वृक्षतोड धोरणाच्या निषेधार्थ शिवतिर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालय वृक्षदिंडी आंदोलन

जिल्हाप्रशासनाच्या वृक्षतोड धोरणाच्या निषेधार्थ शिवतिर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालय वृक्षदिंडी आंदोलन

180

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि 28फेब्रुवारी):-जिल्हाप्रशासनाकडुन केली जात असलेली वृक्षतोड याच्या निषेधार्थ व आंदोलनकर्त्यांसाठी निवाराशेड उपलब्ध करून देण्यात यावे तसेच जिल्हा क्रिडा संकुल या ठिकाणी करण्यात आलेली वृक्षतोड प्रकरणात तसेच गायरान डोंगरातुन अवैध मुरूम उत्खनन करून पर्यावरणाचा नाश करणा-या संबधित दोषींवर कारवाई करण्यात यावी आदि मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२८ फेब्रुवारी २०२२ सोमवार रोजी शिवतिर्थ (छत्रपती शिवाजीमहाराज चौक)ते जिल्हाधिकारी कार्यालय “वृक्षदिंडी आंदोलन “करण्यात येऊन निवासी उपजिल्हाधिकारी बीड संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले.आंदोलनात पत्रकार बालाजी तोंडे, संपादक बीड प्रसार गणोरकर, शेख युनुस,मोहम्मद मोईज्जोदीन,सय्यद आबेद,शेख मुबीन, अशोक येडे, रामधन जमाले, आदि सहभागी होते.
.
मागण्या:-
जिल्हाधिकारी कार्यालय व न्यायालयासमोरील तोडलेल्या झाडाच्या बदल्यात १०० झाडे लावण्यात यावीत.
२)बीड तालुक्यातील सह्याद्री-देवराई जळीतकांड प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.
३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ५० वर्षीय कडुनिंबाचे झाड तोडल्यामुळे आंदोलनकर्त्यांची सावली हिरावली असुन तात्काळ निवाराशेड उपलब्ध करून देण्यात यावे अथवा रोटरी सेंट्रल क्लब बीड यांना निवारा शेड उभारण्यास परवानगी देण्यात यावी.
४) जिल्हा क्रिडा संकुल येथील ४ झाडांचे मोठाले बुंदे कोणाच्या लेखी परवानगीने तोडण्यात आले व का तोडण्यात आले याविषयी सविस्तर चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावेत.

पोहीचा देव (दत्तमंदिर)आवारातील निर्माणाधीन खडीक्रशर बंद करण्यात यावे
____
बीड तालुक्यातील मौजे कोळवाडी येथील पोहीचा देव (दत्तात्रेय देवस्थान)आवारात निर्मानाधिन खडीक्रशर देवस्थान, देवस्थानातील निवासी संत, भाविक यांना श्वसनविकार तसेच वाहतुकीमुळे रस्त्याची दुरावस्था तसेच शेजारील मोरदरा येथील राखीव वनविभागातील वन्यप्राणी यांच्या दृष्टिकोणातुन धोकादायक असून तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी महंत विश्वनाथ महाराज, राजेभाऊ गिरे,अर्जुन गिरे,राजेभाऊ चौरे तसेच भाविक भक्तांनी आदिंनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here