




🔹आमदारांच्या हस्ते भुमिपुजन ; काम पुर्णत्वानंतर महिन्याभरानंतर कामाचे भुमिपुजन
🔸ग्रामस्थांची ऊदासीनता निकृष्ट रस्त्यास कारणीभूत;जाब विचारायला हवा
✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.27फेब्रुवारी):- जिल्ह्य़ातील ग्रामिण भागातील दळणवळणाची सोय व्हावी यासाठी ग्रामविकास विभागामार्फत अर्थ सहाय्यीत प्रकल्प महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत राबविण्यात येतात मात्र स्थानिक राजकारणी आणि आधिकारी यांनी संगनमतानेच योजना चुरून खाल्याचे दिसुन येत आहे.
आमदारांच्या हस्ते भुमिपुजन ; काम पुर्णत्वानंतर महिन्याभरानंतर कामाचे भुमिपुजन
_______
बीडचे आ.संदिप क्षीरसागर यांनी विशेष प्रयत्नातुन आणलेल्या बालाघाटावरील २३ कोटी रूपयांच्या विविध विकासकामांचे पुजन करताना सुरूवात मौजे. खंडाळा ता.जि.बीड येथुन दि.१९ डिसेंबर २०२१ रोजी करण्यात आली, यावेळी रा.मा. ५६ ते खंडाळा-ढालेवस्ती रस्ता सुधारणा करणे कामाचे भुमिपुजन करून गेले, रस्त्याची एकुण लांबी ३:२० किलोमीटर असून रस्त्याची अंदाजित किंमत १ कोटो १७ लाख ५६ हजार रूपये आहे ठेकेदाराचे नाव एम.टी. मस्के असुन देखभाल दुरूस्तीची हमी ५ वर्षाची आहे, विशेष म्हणजे काम सुरू केल्याचा दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ असुन काम पुर्णत्वाचा दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ असा बोर्ड लावलेला आहे.
ग्रामसडक योजनेतुन रस्त्यांना अच्छे दिन की राजकीय नेते आणि आधिका-यांना???
____
बीड जिल्ह्य़ातील ग्रामिण भागातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात येत नसुन अत्यंत निकृष्ट दर्जाची तसेच काम सुरू करण्या अगोदरच काम पुर्ण झाल्याचे फलक लावल्याचे दिसुन येतात, टक्केवारीतुन स्थानिक कार्यकर्ते यांना आगामी जिल्हापरिषद निवडणुकीत खर्चाचा निधी म्हणून ही कामे उरकण्यात येत आहेत.
ग्रामस्थांची ऊदासीनता निकृष्ट रस्त्यास कारणीभूत;जाब विचारायला हवा
____
ग्रामसडक योजनेंतर्गत होणारे रस्ते निकृष्ट दर्जाचे होत असताना स्थानिक ग्रामस्थांची उदासिनता दर्जाहीन रस्त्यास कारणीभूत असुन आपल्याला काय करायचे ? आपण कशाला डोळ्यावर या या भुमिकेतुन ग्रामस्थ दुर्लक्ष करतात आणि रस्ता खराब झाल्यानंतर तक्रारी करतात त्यामुळेच नागरीकांमध्ये जागरूकता आवश्यक




