Home महाराष्ट्र आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या वारसांना नाम फाउंडेशनचा मदतीचा हात

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या वारसांना नाम फाउंडेशनचा मदतीचा हात

96

🔸डॉ. पद्मांजली अमरसिंह पंडित यांच्या हस्ते धनादेश वाटप

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.27फेब्रुवारी):;गेवराई तालुक्यात सन २०२० मध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या, त्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबीयांच्या वारसांना नाम फाउंडेशनच्या वतीने प्रत्येकी २५ हजार रुपये मदतीच्या धनादेशाचे वाटप डॉ. पंद्मांजली अमरसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, डॉ. सर्वोत्तम शिंदे, नाम फाउंडेशनचे गेवराई तालुका प्रभारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

गेवराई येथील श्री साई सोनोग्राफी अ‍ॅन्ड स्किन केअर सेंटर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेवराई तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे वारस विजया गायकवाड, प्रियंका बावचकर, लता हिंदोळे, रोहन मोटे, कांताबाई तौर, पदमाबाई फाटक, सुवर्णा नागरे, कमल लाळगे, सविता आहेर, उषा गायकवाड, कृष्णा निकम, दैवशाला चव्हाण, जिजाबाई टकले, मनिषा जंगले, सचिन राठोड, कविता उबाळे, गंगाबाई पवार, सुनिता सावंत, सिमा मोघे, सिताबाई गिरे यांना नाम फाउंडेशनकडुन प्रत्येकी २५ हजार रुपयांचा धनादेश डॉ. पद्मांजली अमरसिंह पंडित, फुलचंद बोरकर, डॉ. सर्वोत्तम शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते सुर्पूद करण्यात आले.

नाम फाउंडेशनचे गेवराई तालुका प्रभारी तथा नागझरीचे सरपंच वचिष्ट शिंदे यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी फुलचंद बोरकर, डॉ. मनोज मडकर, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगदिश शिंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास दत्ता दाभाडे, अक्षय पवार, धर्मा कदम, अमोल मडके, राजेंद्र हाडुळे, युवराज नागरे, संदिप मडके, गोकुळ चोरमले, बाळु माळदकर आदी उपस्थित होते.

Previous articleनवाब मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ म्हसवड येथे महाविकास आघाडीचे रास्ता रोको आंदोलन
Next articleएम्ब्रॉयडरी अँड स्टीचिंग क्लस्टर कौशल्य विकासासह रोजगाराचे केंद्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here