Home महाराष्ट्र मुन्नादेवी ॲण्ड मंगलादेवी फाउंडेशनने निभावले अनाथ मुलीच्या लग्नाचे कर्तव्य….

मुन्नादेवी ॲण्ड मंगलादेवी फाउंडेशनने निभावले अनाथ मुलीच्या लग्नाचे कर्तव्य….

49

🔹समाजसेवा करणे माझे आद्य कर्तव्य – जीवनआप्पा बयस.

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.27फेब्रुवारी):-येथील मुन्ना देवी अँण्ड मंगलादेवी मल्टीपर्पज फाउंडेशन गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी गरजवंतासाठी नेहमी अग्रेसर आहे. येथील दोन विद्यार्थिनींच्या पालकांचे सुमारे ९ वर्षांपूर्वी निधन झाले. त्यावेळी त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला, अशा वेळी संस्थेचे अध्यक्ष जीवन आप्पा बायस यांनी या विद्यार्थिनींचे पालकत्व स्वीकारले सदर विद्यार्थिनींचे पदवीपर्यंत शिक्षण संस्थेमार्फत केले. त्यातील एक विद्यार्थिनी स्वाती अरुण बिसेन हिचे नुकतेच लग्न ठरले संस्थाध्यक्ष जीवन आप्पा बयस यांनी सदर मुलीला लग्नप्रित्यर्थं सोनसाखळी भेट देऊन लग्नापर्यंतचे उत्तरदायीत्व व पालकत्व पार पाडले. याबद्दल विविध मान्यवर व्यक्तींकडून संस्थेचे कौतुक व त्यांचे उद्गार निघत आहे.

संस्थेमार्फत अन्नछत्र सुद्धा गरिबांसाठी सुरू केले आहे. यावेळी संस्थाध्यक्ष जीवन आप्पा बयस, तेजेंद्र चंदेल, धीरेंद्र पुरभे, गोविंद जनकवार, निलेश बयस इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय संस्था विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य, सायकल वाटप, धरणगावातील प्रत्येक शाळेतील दोन विद्यार्थी दत्तक घेतले असून त्यांचा सर्व खर्च संस्था करते, धरणगाव परिसरातील धार्मिक कार्यात तसेच मंदिर जीर्णोद्धारसाठी संस्था मदत करते, सुमारे पन्नास निराधार व्यक्तींना घरपोच नियमित जेवणाचा डबा पोहोचवला जातो, त्यासाठी देणगी देणाऱ्यांचा पैसा सत्कारणी लागणार आहे, असे संस्थेचे संचालक मुकेश बयस यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here