Home महाराष्ट्र अबब!!! ..सामान्य रूग्णालय, खामगांवच्या कैलेंडर मध्ये फरवरी महिना ३१ दिवसाचा

अबब!!! ..सामान्य रूग्णालय, खामगांवच्या कैलेंडर मध्ये फरवरी महिना ३१ दिवसाचा

189

✒️खामगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

खामगांव(दि.27फेब्रुवारी):-येथील सक्रीय सामाजिक व आरटीआय कार्यकर्ता सुरज यादव यांनी स्थानिक सामान्य रूग्णालयात माहितीचा अधिकारा अंतर्गत दि. ३१/१/२०२२ रोजी कार्यरत सर्व कर्मचार्यां संबंधीत व रूग्णालयाच्या विविध कामांसाठी दिल्या गेलेल्या कंत्राटी कामांची संपुर्ण माहिती मागितली होती. त्या संदर्भात रूग्णालयाकडून जबाबी पत्र क्र. ३०२, दि. २१/२/२०२२ रोजी सुरज यादव यांना प्राप्त झाले त्यात असे नमुद आहे कि सुरज यादव यांचा माहिती अर्ज *दि. ३१/२/२०२२* रोजी कार्यालयात प्राप्त झाले व मागितलेली माहिती हे शासन निर्णय १७ आक्टोंबर २०१४ व माहिती अधिकार अधिनियम मधील कलम २ व ८ अन्वये अंतर्गत माहिती देता येणे शक्य नाही. या पत्रातील विशेष बाब म्हणजे पत्रावर मा. प्रशासकिय अधिकार्याची स्वाक्षरी हि आहे. या वरून सामान्य रूग्णालयाच्या अधिकार्यांचा कार्य झोपेत सुरू राहते व सामान्य रूग्णालय, खामगांवच्या कैलेंडर मध्ये फरवरी महिना ३१ दिवसाचा… असे समजते.

प्रशासकिय अधिकार्याची अश्या प्रकारच्या महत्त्वपूर्ण कागदांवर बिनधास्त सही करून दिल्या वरून त्यांच्या जबाबदारी पाळण्याचा कौशल्या वर प्रश्नचिन्ह ? निर्माण झालेला आहे… अश्या प्रकारच्या बिनधास्त सह्या केल्यामुळे किती बिले काढून भ्रष्टाचार झाला असेल याची शक्यता नाकारता येत नाही ? याची चौकशी झाली पाहिजे व जबाबदार अधिकारीं कडून या प्रकारच्या चुकांमुळे रूग्णांच्या उपचाराबाबत हि प्रश्नचिन्ह ? निर्माण झालेले आहे… प्रत्येक वेळे प्रमाणे या वेळी हि सदर अधिकार्या कडून काही न काही कारण – कलम दाखवून रूग्णालया बाबतची माहिती लपविण्यात येते. आपल्या वकिलांचा सल्ल्याप्रमाणे पुढची प्रक्रिया करणार आहे असे सुरज यादव यांनी कळविले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here