Home महाराष्ट्र नवाब मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ म्हसवड येथे महाविकास आघाडीचे रास्ता रोको आंदोलन

नवाब मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ म्हसवड येथे महाविकास आघाडीचे रास्ता रोको आंदोलन

68

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.27फेब्रुवारी):-राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडी द्वारे केलेल्या अटकेच्या कारवाई विरोधात म्हसवड येथील एस टी स्टॅन्ड चौकात महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करणेत आले यावेळी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करणेत आली.केंद्र सरकारने तपास यंत्रणांचा गैरवापर करत खोट्या चौकशी व दडपशाहीने ना.मलिक यांच्यावर कारवाई केल्याचा यावेळी आरोप करणेत आला.

यावेळी जमलेल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोदी सरकार आणि भाजपच्या विरोधात घोषणा करत झालेल्या अटकेचा निषेध व्यक्त केला.महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि नेते याची निषेधपर भाषणे झाली यावेळी आंदोलना दरम्यान एस टी स्टॅन्ड चौकात दुतर्फा प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.या आंदोलनात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा प्रा.कविता म्हेत्रे, प्रा.विश्वबर बाबर,कॉग्रेस माण तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने,माण शिवसेना उपतालुका शिवदास केवटे, राष्ट्रवादी कॉग्रेस म्हसवड शहर अध्यक्ष युवराज सूर्यवंशी,राजू भोसले, नगरसेवक विकास गोजारी,अनिल लोखंडे आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here