Home महाराष्ट्र मानवी सांगडा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ

मानवी सांगडा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ

84

🔸गेवराई जवळील पालख्या डोंगरावर उघडकीस आली घटना ; आत्महत्या की घातपात?

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.27फेब्रुवारी):- शहरापासून जवळ असलेल्या पालख्या डोगरावर एक मानवी शरीराचा सांगाडा सापडला असुन त्याचे मुंडके झाडाला टागलेले तर धडाचा सापळा खाली पडलेल्या आवस्थेत आढळल्याने गेवराई तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सदरील इसमाने आत्महत्या केली की त्याचा कोणी घात केला ? हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होईल.
 
या बाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील पालख्या डोंगरावर एक बेवारस दुचाकी पडलेली आहे, अशी माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटना स्थळावर जावुन पाहणी केली. तेंव्हा एका झाडाला मानवी सांगाडा लटकलेलेल्या आवस्थेत दिसला. यामधे त्याचे मुंडके झाडाला टांगलेले तर शरीराचा पुर्ण सांगाडा खाली पडलेल्या आवस्थेत होता.
 
पोलीसांनी घटनेचा पंचनामा करुन सांगाडा तपासणीसाठी आंबाजोगाई येथे पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून नागरीकांमधे घबराट पसरली आहे. दिड महिन्यापूर्वी एक मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीसांना प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने पोलीस तपास आहेत. सांगाड्याचा आहवाल आल्यावर सत्य समोर येइल. तेव्हा हा घातपात आहे की आत्महत्या ? हे स्पष्ट होईल.

Previous articleयुक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचं पहिलं विमान मुंबईत दाखल, विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास
Next articleनवाब मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ म्हसवड येथे महाविकास आघाडीचे रास्ता रोको आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here