



✒️अहमदनगर(पुरोगामी न्युज नेटवर्क)
अहमदनगर(दि. २६फेब्रुवारी):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्र प्रभारी व राज्य उपाध्यक्ष श्री रमेशजी मकासरे साहेब व उत्तर महाराष्ट्राचे लोकप्रिय अध्यक्ष श्री राजाभाऊ कापसे यांनी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी पक्षाचं झुंजार नेतृत्व महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांची फेरनियुक्ती केली.
नामदार रामदासजी आठवले साहेब यांचे विचार देशाच्या कानाकोपऱ्यात नेणारे अनिलभाई गांगुर्डे हे पक्षाचे एकनिष्ठ व अंत्यत ऍक्टिव्ह कार्यकर्ते असून मागील 4 वर्षांपासून त्यांनी पक्षाला एक उंचीवर नेऊन ठेवलं असून अतिशय अतुलनीय कामगिरी ते करीत आहेत..या पुढे ही पक्षाचे ध्येय धोरणं ते जनमानसात रुजवतील यात शंका नाही असे गौरवउद्गार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी काढले


