



🔸बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था दिव्यांगांना वेठीस धरत असल्याचा प्रहारचे बीड जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे यांचा आरोप
✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.26फेब्रुवारी):-दिव्यांगांच्या 25 जुन 2018 च्या शासन निर्णयाची कार्यशाळा घेऊन काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी प्रहार संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले की ग्रामपंचायतीना 25 जुन 2018 शासन निर्णयानुसार 5% निधी खर्च करणे बंधनकारक असताना हि बीड जिल्ह्यातील असंख्य ग्रामपंचायतीकडुन या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही या बाबत जिल्हा परिषदेकडून कोणतीही दखल घेतली जात नाही शिवाय शासन नियमांची व वरीष्ठ अधिकारांच्या आदेशाची पायमल्ली केली जाते.
दिव्यांगांच्या कल्याणार्थ शासनाकडून 5% निधी स्थानीक स्वराज्य संस्थांच्या स्व उत्पन्नातुन राबवायची असे स्पष्ट आदेश आहेत तरी हि या विषयाला ग्रामविकास अधिकारी गांभीर्याने घेत नाहित तर स्थानिक दिव्यांगास उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल हि केली जात आहे त्यामुळे सर्व गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी अधिकारी यांची कार्यशाळा घेऊन 25 जुन 2018 च्या शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी मागणी प्रहार संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे विठ्ठल मुंडे विष्णू मुंडे संतोष आघाव अशोक सोनवणे विक्रम मोमीन रमेश चव्हाण यांच्यासह बीड जिल्ह्यातील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे


