



🔹आमदार देवेंद्र भुयार यांनी उपलब्ध करून दिला २ कोटी ६४ लक्ष रुपयांचा निधी
✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)
मोर्शी(दि.26फेब्रुवारी):-ग्रामीण भागात विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीतून विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी आज हिवरखेड जिल्हा परिषद सर्कलमधील विविध विकास कामाच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते मोर्शी तालुक्यातील हिवरखेड ते डोंगरयावली रस्ता सुधारणा करणे २१ लक्ष रु. डोंगर यावली येथे २५१५ अंतर्गत दापोरी रोड पासून ते ग्रामपंचायत पर्यंत सिमेंट काँक्रीट करणे ५ लक्ष ७५ हजार रुपये, व्यायाम शाळा बांधकामाचे लोकार्पण 7 लक्ष रु. २५१५ अंतर्गत जितू युवनाते ते मध्य प्र.सिमे पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता करणे ५ लक्ष ७५ हजार रुपये. घोडदेव येथील श्रीमती सुमित्रा बोटरे यांच्या शेतापासून ते मध्य प्रदेश सीमेपर्यंत पांधण रस्ताखडीकरण करणे १७.८२ लक्ष रु. ग्रामपंचायत घोडदेव येथील घोडदेव स्टॉपते श्री प्रमोददंडाळे यांच्या शेतापर्यंत रस्ता खडीकरण १७.८२ लक्ष रु. सालबर्डी येथील व्यामशाळा बांधकामाचे लोकार्पण. ७ लक्ष रु. दिलीप युवनाते ते वॉटर सप्लायर विहीर पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता ५.७५ लक्ष रु. भीवकुंडी येथे व्याम शाळा बांधकामाचे लोकार्पण ७ लक्ष रु. पाटणाला येथे पाटणाला प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहचविण्यासाठी कॅनल तयार करण्याकरिता ४० लक्ष ८६ हजार रुपये, पाळा येथे २५१५ अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता करणे ५.७५ लक्ष रुपये, csc सेंटर लोकार्पण करणे ४ लक्ष रु. सातपुडा वस्ती येथील नविन Dp चे उद्घाटन २.७० लक्ष रु. व्यायाम शाळा बांधकामाचे लोकार्पण ७ लक्ष रु.मायवाडी येथे मेनरोड ते मायवाडी येथील जि.प.शाळे पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता १ कोटी १४ लक्ष ६४ हजार रुपये, मायवाडी येथे २५१५ अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता ५.७५ लक्ष रु. या सर्व विकसकामांकरिता २ कोटी ६९ लक्ष रुपये मंजूर करून विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी भूमिपूजन समारंभाला आमदार देवेंद्र भुयार, माजी शिक्षण सभापती श्रीपादराव ढोमने, सरपंच विजय पाचारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, उमेश गुडधे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, विलास राऊत, डोंगर यावली येथील सरपंच भाग्यश्री केचे, उप सरपंच कांचन कुकडे, पाळा येथील सरपंच अजय राऊत, आनंदराव धुर्वे, राजेशसिंग टांक, आनंद पानडे, मोरेश्वर गुडधे, अनिल अमृते, नामदेवराजी महल्ले, चक्रधर ठवळी, प्रकाश ठोके, प्रशांत राणे, चक्रधर निस्वादे, सार्थक ठोके, अर्जुन अमृते, अमर गुडघे, अजय गुडधे यांच्यासह हिवरखेड सर्कलमधील सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.
आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी विधानसभा मतदार संघाच्या विकासाचे अनेक प्रश्न मांडून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांच्या कडे निधीची मागणी केली. दरम्यान मोर्शी वरुड मतदार संघाचा सर्वांगीण विकास व कायापालट करण्याचा संकल्प घेऊन आ. देवेंद्र भुयार यांनी आपल्या सुरुवातीच्या काळातच भरगॊस निधी खेचून आणला आहे . या निधि अंतर्गत मोर्शी विधानसभा मतदार संघात विकास कामांचा धडाका सुरु असल्याने वरुड मोर्शी तालुक्यातील नागरिकांना विकासाचे पर्व अनुभवास मिळत आहे .


