Home चंद्रपूर आमदार स्थानिक विकास निधीतून विकासकामांना नागभीड तालुक्यात मंजुरी

आमदार स्थानिक विकास निधीतून विकासकामांना नागभीड तालुक्यात मंजुरी

78

🔹विधानपरिषद सदस्य डॅा. रामदासजी आंबटकर यांच्या हस्ते भुमीपुजन 

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपुर(दि.26फेब्रुवारी):- वर्धा गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्राचे विधानपरिषद सदस्य आमदार डॅा. रामदासजी आंबटकर यांनी चंद्रपुर जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी आमदार स्थानिक विकास निधीतून निधी मंजुर केलेला आहे . यातील नागभीड तालुक्यांतील गंगासागर हेटी , वासाळा मेंढा व वलनी येथील विकासकामांचे भुमीपुजन आमदार डॅा. रामदासजी आंबटकर यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. याप्रसंगी भाजपा जिल्हा संघटन महामंत्री व जि. प . सदस्य संजय गजपुरे यांची विशेष उपस्थिती होती .

पारडी – मिंडाळा- बाळापुर क्षेत्राचे जि.प. सदस्य यांच्या मागणीनुसार गंगासागर हेटी व वासाळामेंढा या गावात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विधानपरिषद सदस्य आमदार डॅा. रामदासजी आंबटकर यांच्या निधीतून सोलर ड्युएल पंप मंजुर करण्यात आले. आपल्या भागात विकासकामांसाठी विविध विभागाकडे व लोकप्रतिनिधींकडून निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करुन कामे खेचून आणणारा लोकप्रतिनिधी संजय गजपुरे असल्याचे यावेळी आमदार डॅा. रामदासजी आंबटकर यांनी सांगितले . विकास निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने संजय गजपुरे यांनी आमदार महोदयांचे आभार मानले तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार डॅा. रामदासजी आंबटकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या भुमीपुजन प्रसंगी भाजपा ओबीसी आघाडीचे पुर्व विदर्भ संयोजक रविन्द्र चव्हाण , भाजपा माजी तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम , गंगासागर बोटींचे सरपंच दिलीप गायकवाड व उपसरपंच शुध्दोधन बारसागडे , वासाळामेंढाचे सरपंच पांडुरंग पाटील गायकवाड व उपसरपंच संदिप कन्नाके , जि.प. सर्कल प्रमुख धनराज बावणकर , कृऊबास संचालक धनराज ढोक , महिला आघाडी तालुका महामंत्री गीताताई बोरकर व कु. उज्वला माटे , ज्येष्ठ नेते सुखदेवजी भाकरे , आकापुर च्या माजी सरपंच श्रीमती निताताई बोरकर , सौ. संगिताताई गहाणे , वासाळा मेंढाच्या माजी सरपंच सौ. दुर्गाताई वाटकर ताई , कैलास अमृतकर , नितेश कुर्झेकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामसेवक , शक्ती केंद्र प्रमुख , बुथ प्रमुख व कार्यकर्ते तथा नागरिकांची उपस्थिती होती .

Previous articleई-पीक पाहणी व नवीन सातबारा वाटप योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – महसूल मंत्री थोरात
Next articleहिवरखेड जिल्हा परिषद सर्कलमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here