



✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)
मुंबई(दि.26फेब्रुवारी):- आंबेडकरी चळवळीतील आंदोलन मोर्चा घेण्यात अग्रेसर असलेले युवा नेतृत्व सुरेश वाघमारे यांची राजकीय सामाजिक कार्याची दखल घेतं महाराष्ट्रराज्य माथाडी व श्रमजीवी कामगार सेनेच्या उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती संघटनेचे अध्यक्ष रवी सरवदे यांच्या हस्ते व अजय बारी,राष्ट्रीय सरचिटणीस राजेश घाडगे खजिनदार यांनी नियुक्ती पत्र व ओळखपत्र देत उत्तर मुंबई जिल्ह्याची जबाबदारी बहाल केली.
असून सुरेश वाघमारे यांनी श्रमजीवी कामगारांना संघटित करून असंघटित कामगारांचे प्रश्न शासन दरबारीं जन आंदोलन उभारणार व माथाडी कामगारांना न्याय मिळून देणार असे निवडी प्रसंगी सुरेश वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी किरण पुजारी, कामराज हरिजन. अमित कटारिया, मनोज केवट अझरुदिन अन्सारी मुल्ला, आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते वाघमारे यांच्या या नियुक्ती बद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


