Home महाराष्ट्र महाराष्ट्रातील सिनेमागृह व नाटयगृह 100% क्षमतेने सुरु करा

महाराष्ट्रातील सिनेमागृह व नाटयगृह 100% क्षमतेने सुरु करा

103

🔸प्रसाद साळवी ठाणे जिल्हा अध्यक्ष भारतीय शेतकरी कामगार पक्ष यांचा मुख्यमंत्र्यांना निवेदन

✒️ठाणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

ठाणे(दि.26 फेब्रुवारी):-कोराना काळाच्या दोन वर्षामध्ये सगळ्यात मोठा फटका हा संपूर्ण चित्रपटसृष्टीला, कलाकारांना बसला आहे. आता सध्या परिस्थिती मध्ये आपल्या राज्यात सरकारने बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी शंभर टक्के क्षमतेने सुरु केलेल्या दिसत आहे. रेल्वे सेवा,बस सेवा, मार्केट यार्ड, विमान सेवा, लग्नसराई, राजकीय मेळावे असे सगळे सुरु असतांना फक्त महाराष्ट्रातील सिनेमागृह, नाट्यगृह हे फक्त 50% क्षमतेने सुरु आहे.

मग महाराष्ट्रातील कलाकांराना मोठा प्रश्न पडला आहे की मग सिनेमागृह आणि नाट्यगृह एक शंभर टक्के क्षमतेने का सुरु होऊ शकत नाही? कोरोना हा फक्त चित्रपटगृह व नाट्यगृह
यातूनच जास्त पसरतो का? असा प्रश्न देखील राज्यातील कलाकारानच्या मनात उपस्थित होत आहे.

म्हणून विनंती आहे की लक्षपूर्वक महाराष्ट्रातील कलाकार व चित्रपटसृष्टीवर जी उपासमारीची वेळ आली आहे. ती लवकर जावी याकरिता साहेब आपण लवकरात लवकर निर्णय घेऊन सिनेमागृह, नाट्यगृह ही शंभर टक्के क्षमतेने सुरु करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here