



🔺विषबाधेचं कारण अद्याप अस्पष्ट
🔺काय आहे प्रकरण?
🔺बीड जिल्ह्यातील दुदैवी घटना
✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:;9075913114
बीड(दि.26फेब्रुवारी):-जेवणाने दोन सख्ख्या बहिणींना गिळल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जेवणातून एकाच कुटुंबातील चौघा जणांना विषबाधा झाली. या घटनेत दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची आई आणि लहान बाळ यांची प्रकृती गंभीर आहे. बीड जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 6 वर्षीय साधना आणि 4 वर्षीय श्रावणी यांचा मृत्यू झाला, तर आई भाग्यश्री धारासुरे आणि 8 महिन्याच्या मुलावर उपचार सुरु आहेत. बीडमधील अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथे ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. जखमी मायलेकावर आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मात्र विषबाधेचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
काय आहे प्रकरण?
जेवणातून एकाच कुटुंबातील चौघा जणांना विषबाधा झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला, तर महिला आणि लहान बाळ यांची प्रकृती गंभीर आहे.
चिमुकल्यांचा मृत्यू, मायलेकावर उपचार
सहा वर्षीय साधना धारासुरे आणि चार वर्षीय श्रावणी धारासुरे या दोन लहानग्या सख्ख्या बहिणींचा विषबाधेमुळे मृत्यू झाला. तर त्यांची आई भाग्यश्री धारासुरे आणि 8 महिन्याच्या धाकट्या भावावर उपचार सुरु आहेत.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथे ही घटना घडली आहे. धारासुरे कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
विषबाधेचं कारण अद्याप अस्पष्ट
मायलेकावर आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. चौघा जणांना विषबाधा कशामुळे झाली, याचं कारण अद्याप समजलेलं नाही.





