Home महाराष्ट्र युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न

युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न

76

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अनेक विद्यार्थी सुरक्षे अभावी मायदेशात परतण्याची धडपड करत आहे.अनेक विद्यार्थ्यांनी तेथील भारतीय दूतावास व भारतातील अनेक खासदार व आमदारांशी संपर्क करून मदतीची मागणी केली आहे.तेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत असले तरी विद्यार्थ्यांना त्याची मदत होत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.. भारत सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांना तात्काळ मायदेशी आणावे.

युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरुप परत आणण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय दूतावासाने युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी आणि भारतीय नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. युक्रेनियन एअरस्पेस बंद झाल्याने या सर्वांना भारतात आणण्यासाठी भारताकडून पर्यायी व्यवस्था केली जात असल्याचे दूतावासाने म्हटले आहे.

मेडिकल स्टुडंट्स सर्वाधिक युक्रेनच्या विविध भागात एकूण २० हजारांवर भारतीय विद्यार्थी आणि नागरिक सध्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम शिकत असलेल्यांची संख्या सर्वाधिक आहेत. दरम्यान, काही विद्यार्थी मायदेशी परतले आहेत.मात्र अजूनही किव मध्ये बहुतांश विद्यार्थी अडकले आहेत.

कीवमध्ये हजारो परदेशी विद्यार्थी आणि नागरिक अडकून पडल्याचं चित्र दिसून येतंय. यामध्ये अनेक भारतीय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या विद्यार्थ्यांचा भारताशी वेगवेगळ्या माध्यमातून संवाद कायम असला तरी त्यांच्या मनातील धास्ती स्पष्टपणे दिसून येतेय. युक्रेनमधून बाहेर पडण्याचा विद्यार्थी आटोकाट प्रयत्न करत आहेत.

कीवमध्ये अडकून पडलेल्या काही भारतीय विद्यार्थ्यांशी माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी, एका विद्यार्थ्यानं दिलेल्या माहितीनुसार आज सकाळीच (२४ फेब्रुवारी) सुरू झालेल्या बॉम्बस्फोटांमुळे सगळ्यांचीच झोप उडाली. परिणाम म्हणून परिसरातील मार्केटही बंद राहिले. ही परिस्थिती किती दिवस कायम राहील याबद्दल अनिश्चितता आहे. त्यामुळे अनेक घरांना अन्नधान्य आणि पाण्याचा प्रश्नही भेडसावतोय. यामुळे युक्रेनसोबतच परदेशी नागरिकही धास्तावले आहेत.

आणखी एका विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार, पाण्याचे सर्व सोर्स बंद झालेत. पिण्याच्या पाण्यासाठी आतापासूनच मोठी रांग लागलीय. सर्व लोक आपापल्या घरांत आवश्यक ती साधनसामुग्री गोळा करण्याच्या प्रयत्नात आहे.

दरम्यान, रशियाकडून युक्रेनच्या अनेक शहारांना टार्गेट करण्यात आलंय. रशियन सेना पूर्व युक्रेनच्या भागात दाखल झाल्याचंही दिसून येतंय. रशियन सेनेकडून कीव विमानतळही ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. हवाई हल्ल्यानंतर कीव विमानतळ रिकामं करण्यात आलंय. सोबतच, विमानांची ये-जा बंद करण्यात आली.

युक्रेनकडे निघालेलं एअर इंडियाचं विमान माघारी

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गुरुवारी (२४ फेब्रुवारी ) सकाळीच युक्रेनवर लष्करी कारवाई करण्याची घोषणा करत अवघ्या जगाला जोरदार धक्का दिला. रशियाच्या या घोषणेमुळे आणि युद्धाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानं युक्रेनमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. यात अधिकतर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. रशियानं युक्रेनवर हल्ला चढवल्यानं आणि हवाई मार्ग असुरक्षित झाल्यानं युक्रेनला जाणाऱ्या अनेक विमानांना माघारी परतावं लागलं. यामध्ये ‘एअर इंडिया’च्या विशेष विमानाचाही समावेश आहे. यामुळे ५०-६० विद्यार्थी विमानतळाजवळच्या महामार्गावर अडकून पडले होते.

या विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु हा संपर्क होऊ शकला नाही.

गुरुवारी (२४ फेब्रुवारी)’एअर इंडिया’च्या विमानानं जवळपास ५०० ते ७०० विद्यार्थी भारतात परण्याच्या तयारीत होते परंतु, रशियाच्या एअरस्ट्राईकमुळे हे विद्यार्थी कीवमध्येच अडकून पडलेत. विद्यार्थी भारतातील आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.विद्यार्थ्यांवर अशी संकटाची वेळ आली आहे. आता सरकारने परदेशातील संस्थांसोबत संवाद साधत विद्यार्थ्यांना सुरक्षितरीत्या परत आणण्यासाठी तत्काळ कारवाई करण्याची अपेक्षा आहे.

✒️प्रा डॉ सुधीर अग्रवाल(मो:-९५६१५९४३०६)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here