



✒️सिध्दार्थ वाठोरे(हदगाव प्रतिनिधी)
हदगाव(दि.25फेब्रुवारी):-डॉक्टर विपिन ईटणकर जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिनांक २५ रोजी मौजे शिवदरा व पळसा या गावांना भेट दिली मौजे शिवदरा व पळसा येथे पी. एम. किसान योजने अंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांचे खाते दुरुस्ती करणे नवीन खाते समाविष्ट करणे त्रुटिची पूर्तता करणे बाबत सखोल असे मार्गदर्शन केले.
मिशन आपुलकी अन्वये मौजे शिवदरा येथील जिल्हा परिषद शाळेतील वॉटर फिल्टर ची पाहणी करून उपस्थित प्रतिष्ठित नागरिक शेतकरी यांना सक्रिय सहभाग नोंदवण्या बाबत सूचना देऊन पांदण रस्त्याची पाहणी केली तसेच उपस्थित शेतकरी नागरिकांना पिक पेरा नोंद करण्याबाबत मार्गदर्शन केले.या दौऱ्यामध्ये ब्रिजेश पाटील उपविभागीय अधिकारी हदगाव जीवराज डापकर तहसीलदार हदगाव मंडळाधिकारी तलाठी व गावातील प्रतिष्ठित नागरिक शेतकरी उपस्थित होते





