Home महाराष्ट्र “विद्यार्थ्यांसाठी एक विषय एक वृक्षारोपण संवर्धन” संकल्पनेतून प्रा राम मेघे अभियांत्रिकी व...

“विद्यार्थ्यांसाठी एक विषय एक वृक्षारोपण संवर्धन” संकल्पनेतून प्रा राम मेघे अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय येथे वृक्षसंवर्धन कार्यक्रम संपन्न

79

✒️बडनेरा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

बडनेरा(दि.25फेब्रुवारी):- येथील विदर्भ युथ वेलफेयर सोसायटी द्वारा संचालित प्रा. राम मेघे अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय येथे महाविद्यालय परिसरात दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येतच असते. विविध आदर्श सामाजिक उपक्रमांबद्दल नेहमी चर्चेत असलेले हे महाविद्यालय आहे. संस्थेचे पदाधिकारी व महाविद्यालयीन प्राचार्य यांच्या उत्स्फूर्थ कल्पनेतून मागील दहा वर्ष्यांपासून महाविद्यालय सामाजिक जाणीव ओळखून दरवर्षी वृक्षारोपण करत आहे व ते वृक्ष जगवतात म्हणूनच तर आज महाविद्यालय परिसर हिरवा शालू नेसून डौलाने डोलत आहे.

दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ रोजी महाविद्यालय परिसरात प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी “विद्यार्थ्यांसाठी एक विषय एक वृक्षारोपण संवर्धन” संकल्पनेतून उन्हाची तिव्रता पाहता फक्त एक झाड लावून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली तदनंतर महाविद्यालय परिसरात प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना तर्फे वापर झालेल्या पाण्याच्या बाटली पासून वृक्ष संवर्धन हि संकल्प ठेवत प्रत्येक झाडाजवळ एक बाटली खड्डा करून लावण्यात आली जेणे करून आपल्याकडील उष्णेतेची झड सहन करू शकेल या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात प्राचार्यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रीय सेवा योजना तर्फे २९७ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

कार्यक्रमाला महाविद्यालयीन प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. आशिष कडू, डॉ. इब्राहिम, प्रा. एम एम जानोरकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष सायवान यांनी रासेयोच्या महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. अनुराधा इंगोले तसेच रासेयोचे सह-कार्यक्रम अधिकारी प्रा. शुभम कदम, प्रा आशुतोष उगवेकर, श्री. निशांत केने व रासेयो स्वयंसेवक चि. अमीर फराझ आणि चि. आयुष् भगत यांच्या सहभागातून केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनाकरता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. अली यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे मा. अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, मा. उपाध्यक्ष अॉडव्होकेट. उदयजी देशमुख, मा. कोषाध्यक्ष प्रा. हेमंतजी देशमुख, मा. सचिव श्री. युवराजसिगजी चौधरी, सन्माननिय सदस्य मा. श्री. शंकरराव काळे, मा. श्री. नितीनजी हिवसे, मा. सौ. रागिनीताई देशमुख, मा. डॉ. सौ. वैशालीताई धांडे व मा. डॉ. सौ. पुनमताई चौधरी यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here