



✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.25फेब्रुवारी):-जिल्हा परिषद सातारा येथे विविध विभागांचा व योजनांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष श्री.ज. गो. अभ्यंकर साहेब ( राज्यमंत्री दर्जा ) आयोगाचे सदस्य श्री.के. आर . मेढे व आर. डी. शिंदे हे जिल्हा परिषद येथे उपस्थित होते. विविध विभागांच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी उपस्तिथ नागरिक व विविध संस्थांची निवेदने स्वीकारली.
यावेळी मौजे शिंदी बुद्रुक तालुका माण येथील बौद्ध समाजाचे सामायिक शेत जमिनीवरील अतिक्रमणामुळे शेतकऱ्यांच्या मूलभूत हक्कावर बाधा आलेने या संदर्भात तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत माण खटाव उपविभागामध्ये उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करणे या समितीचे माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणे व “दलित वस्ती सुधार” योजनेअंर्तगत प्रस्ताव प्राधान्याने स्वीकारून सर्व दलित वस्त्या मध्ये दर्जेदार विकासकामे करणे करिता अधिक निधी उपलब्ध करून देणेत यावा या प्रश्नाबाबत आयोगाचे अध्यक्ष श्री.ज. गो. अभ्यंकर साहेब याना सामाजिक कार्यकर्ते श्री. किरण खरात यांनी निवेदन देऊन सविस्तर चर्चा करणेत आली
यावेळी आयोगाचे अध्यक्षांनी या सर्व प्रश्नी संबंधित प्रशासकीय विभागांना सूचना करून योग्य ती कार्यवाही करणेत येईल असे आश्वसन दिले.याप्रसंगी विविध नागरिक, संघटना आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी उपस्तिथ होते.


