Home महाराष्ट्र टेम्पो-पिकअपच्या अपघातात चालक जागीच ठार; एक गंभीर कुंबेफळजवळील घटना

टेम्पो-पिकअपच्या अपघातात चालक जागीच ठार; एक गंभीर कुंबेफळजवळील घटना

55

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114

केज(दि.25फेब्रुवारी):-भरधाव वेगात असलेल्या टेम्पो आणि पिकअपच्या समोरासमोरील धडकेत टेम्पो चालक जागीच ठार झाला. तर पिकअप चालक गंभीर जखमी झाला आहे. तसेच, पिकअपमधील एक बैल देखील जागीच ठार झाला.हा भीषण अपघात घटना केज- अंबाजोगाई रस्त्यावरील कुंबेफळजवळ आज (दि.24) सायंकाळी 7 वाजता घडला. शेख कलीम शेख खलील (रा.बीड) असे मयत वाहन चालकाचे नाव आहे.

तर गंभीर जखमी असलेल्या पिकअप चालकाची ओळख पटली नव्हती. कुंबेफळजवळ भरधाव वेगात असेल्या आयशर टेम्पो (क्र.एम.एच. 46- एफ 5205) आणि पिकअपची (क्र.एम.एच.43 बी.बी. 1078) समोरासमोर जोरदार धडक झाली.घटनास्थाळावरून टेम्पो चालकाचा मृतदेह आणि गंभीर पिकअप चालकास रूग्णवाहिकेने केज उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. यावेळी स्थानिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here