



🔹मांडवा ग्रामपंचायतीचा वर्षपूर्ती यशस्वी कार्यकाळ पूर्ण, केक कापून झाला साजरा
✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.24फेब्रुवारी):- तालुक्यातील १२० ग्रामपंचायतींपैकी १०५ ग्रामपंचायतीच्या १५ जानेवारी रोजी निवडणुका पार पडल्या त्यामध्ये ७ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या. यामध्ये बजरंगनगरतांडा गट ग्रामपंचायत मांडवा ही ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली. व २२ फेब्रुवारी २०२१ रोजी सरपंच पदी अल्का ढोले यांची निवड झाली. दि.२२ फेब्रुवारी २०२२ रोजी सरपंच पदास यशस्वी १वर्षे पुर्ण झाली.
या सरपंचपदाच्या एका वर्षाच्या कालावधीत जनतेच्या सेवार्थ त्यांनी थकित वीज बिले भरली, वार्ड वाईस पाण्याची व्यवस्था ,स्मशानभूमी शेड बांधकाम ,स्मशानभूमीत नळाची व पाण्याची,लाईटिंगची व्यवस्था, सर्व लहान मोठ्या नाल्या साफ केल्या,पाण्याच्या टाकीला संरक्षक भिंत केली, ग्रामपंचायत कार्यालयात दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले, ग्रामपंचायत कार्यालयास कलरिंग , सम्यक संबोधी बुद्धविहाराची दुरुस्ती,कै.सुधाकरराव नाईक तांड्यात सि.सि.रोड, देवराव आबाळे पाटील यांच्या घरापासून ते उत्तम वाघमारे यांच्या घरापर्यंत असलेली जुनीचे नाली खोदकाम,कै. सुधाकरराव नाईक चौकात मुरूमीकरण व सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी पाईपची व्यवस्था, ४ सीमेंट बेंच, गावातील मुख्य चौकात १० कचराकुंड्या बसविल्या.
कै. वसंतराव नाईक तांड्यात श्री. संत सेवालाल महाराज भवनाचे भूमिपूजन तसेच इत्यादी कामे करून विकास कामाकडे वाटचाल हे बघून गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आज रोजी एक वर्ष पूर्ण होत आहेत .त्यानिमित्त ग्रामपंचायतीमध्ये सर्वप्रथम केक कापण्यात आला.
यावेळी सरपंच अलका ढोले ,उपसरपंच विजय राठोड ,पोलीस पाटील दत्तराव पुलाते , तंटामुक्ती अध्यक्ष सुधाकर चव्हाण, सोसायटीचे अध्यक्ष वसंता आडे, सुदाम आडे,अरुण मंदाडे, ग्रा.पं.सदस्य गोपाल मंदाडे, शालिनी धाड, कमल राठोड, कविता आडे ,संगीता गजभार, जयश्री आबाळे ,आरती पुलाते, ग्यानबा आबाळे,तुकाराम चव्हाण,सुखाजी जाधव,बबन साखरे,रंगराव राठोड, गोविंदा आबाळे,हरिभाऊ धाड,कैलास राठोड, रमेश ढोले,विठ्ठल आडे,उंकडा मंदाडे,बाळु आबाळे,बजरंग पुलाते, देविदास गजभार, गजानन आबाळे, ग्रामपंचायत कर्मचारी प्रदुम्न आबाळे, शेषराव जाधव इत्यादी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


