



🔸तिवडी (नवी) येथे उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न
✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.24फेब्रुवारी):-तालुक्यातील मौजा तिवढी (नवी) येथे रिपब्लिकन युवा सेना शाखेचा उद्घाटन सोहळा तसेच शाखा फलकाचे अनावरण आद. माधवदादा जमदाडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आद. मधुकर झगडे साहेब, आद. प्रकाश गजभारे, आद.अंबादास कांबळे साहेब, आद. सुनील पाटील चिंचोलकर (जिल्हाध्यक्ष यवतमाळ) यांची उपस्थिती होते.शुद्धोधन दिवेकर (शहराध्यक्ष), गौतमजी नवसागरे (तालुका अध्यक्ष), भिमराव खंदारे (उपतालुका अध्यक्ष)तसेच तिवडी येथील शाखा अध्यक्ष रवी खंदारे व शाखेचे सर्व पदाधिकारी व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांचे विचार व मार्गदर्शन ग्रामस्थांना लाभले. हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात व उत्साहात पार पडण्यात आला.


