



✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.24फेब्रुवारी):-पर्यावरण, आरोग्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर जनजागृती करणारे गडचिरोली जिल्ह्यातील सायकल स्नेही मंडळाची साप्ताहिक सायकल रैली सुरू आहे. या साप्ताहिक सायकल रैलीची सांगता परिश्रम भवनात करण्यात आली. याप्रसंगी कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले.
प्रतिमेचे पूजन आणि उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी सायकल स्नेही मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. विलास पारखी, विलास निंबोरकर , डॉ.योगेश पाटील , किशोर पाचभाई , राऊत , उप्पलवार , मारोती दुधबावरे आदी हजर होते


