



✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.24फेब्रुवारी):-बुधवार २३ फरवरी रोजी भारतीय लॉयड्स मेटल कामगार संघ अध्यक्ष श्री.प्रदीपकुमार वाचपेयी यांनी भारत मातेचा फोटोला द्विपप्रवलजन करून व महामंत्री हिवराज बागडे यांनी गेल्यावर्षी भारतीय मजदूर संघ चंद्रपूर चे वरिष्ठ पदाधिकारी कोरोना संकटात मरण पावले त्यांच्याकरिता सर्व कार्यकर्ता दोन मिनिट मोन ठेवून त्यांचा आत्मेला शांती मिळू व समोर कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
भारतीय लॉयड्स मेटल कामगार संघ घूग्घुस कार्यालयात प्रमुख पाहुणे लॉयड्स मेटल कंपनीचे मा.महाप्रबंधक श्री.मा. पाटीदार सर, क्रामिक प्रबंधक श्री. राजेश घारगे,सुरक्षारक्षक श्री. प्रमोद नाकाडे व भारतीय मजदूर संघ चंद्रपूर येथील नवनियुक्त, जिल्हाध्यक्ष श्री. प्रमोद येलचलवार,जिल्हामंत्री श्री.प्रविण मुनगंटीवार ,सहसंघटन मंत्री श्री.प्रशांत कौरासे,वरीष्ठ संघटनचे पदाधिकारी अशोक मांडवकर,देवराव निंदेकर व तसेच सर्वाचे लाडके अध्यक्ष भा.लॉ.मे.का.संघ. प्रदीपकुमार वाचपेयी या सर्वांना शाल,पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.
यावेळी भा.लॉ.मे.का.संघ घुग्घुस कार्याध्यक्ष समीर शील, महामंत्री हिवराज बागडे,संयुक्त महामंत्री राजास्वामी जंगम, कोषाध्यक्ष विठ्ठल ठाकरे, राजेंद्र क्षीरसागर, युसूफ शेख, मंगेश पचारे,संतोष चिंत्तला,सूधिर बावणे, सुनिल लठ्ठा, यासिम शेख, भास्कर कुचणकर, रवींद्र ठाकरे,परशुराम उगे,विजय माथणकर, सागर निचकोला,निरज डांगे,अतुल चौखाद्रे,रामास्वामी कनकम व प्रचार पसार प्रमुख पंकज रामटेके उपस्थित होते.


