Home महाराष्ट्र रुपा कुलकर्णी बोधी, सचिन परब, आणि युवराज गटकळ यांना सामाजिक कृतज्ञता निधीचे...

रुपा कुलकर्णी बोधी, सचिन परब, आणि युवराज गटकळ यांना सामाजिक कृतज्ञता निधीचे पुरस्कार जाहीर

139

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागपूर(दि.24फेब्रुवारी):-सामाजिक कृतज्ञता निधीचे वार्षिक पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यात रुपा कुलकर्णी बोधी, सचिन परब, आणि युवराज गटकळ यांचा समावेश आहे.।कष्टकरी महिलांच्या नेत्या आणि बौद्ध विचारांच्या अभ्यासक व अनुयायी रुपा कुलकर्णी बोधी, नागपूर यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार,प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्याचे अभ्यासक रिंगणकार सचिन परब, मुंबई यांना डाॕ. राम आपटे प्रबोधन पुरस्कार आणि शेतकरी आंदोलनासाठी भरीव योगदान देणारे जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे राज्य समन्वयक युवराज गटकळ, उस्मानाबाद यांना एस एम जोशी कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय सा.कृ.नि. अध्यक्ष गजानन खातू, कार्याध्यक्ष सुभाष वारे आणि विश्वस्त बाबा आढाव यांच्या उपस्थितीत झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे.

9 एप्रिल रोजी नागपूर येथे विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डाॕ. सुखदेव थोरात यांचे हस्ते व गिरीश गांधी यांचे उपस्थितीत पुरस्कार प्रदान कार्यक्रम होईल.पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन अॕड जाकीर अत्तार, (कार्यवाह), विलास भोंगाडे (विदर्भ विभाग प्रतिनिधी), सामाजिक कृतज्ञता निधीचे पदाधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here