



🔹गाडगेबाबांच्या जयंती निमित्त तसेच गजानन महाराजांच्या प्रगटदिना निमित्त ग्राम स्वच्छता
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि. 23 फेब्रुवारी):-गुरुदेव सेवा मंडळ सावरगाव येथील गुरुदेव सेवकानी वंदनीय गाडगेबाबांच्या जयंती निमित्त तसेच गजानन महाराजांच्या प्रगटदिना निमित्त ग्राम स्वच्छता केली. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मते मंदिरात घंटी वाजवत बसण्यापेक्षा गावातील सापसपाई करावी. देव हा आता मंदिरात नाही तर तो सेवा करणाऱ्या सोबत राहतो, ज्याचा मीपणा गेला त्याच्या सोबत देव राहतो असे उद्दिष्ट साधून गावकरी सेवकांनी ग्राम स्वच्छता केले.
ग्राम स्वच्छता करण्यासाठी गुरुदेव सेवक आमचे ज्येष्ठ मिनाबाई नागापुरे, अनिता साहारे, ममता ठीकरे, दुर्गाली नागापुरे, देवयानी नागापुरे, शिवानी मुंगमोडे, महिला मंडळाचे अध्यक्ष कल्पना बोरकर, घनश्याम बोरकर, सप्निल नेवारे, प्रा. युवराज सर रामटेके, शुभम ठीकरे, सेवाधिकारी जितेन्द्र मुंगमोडे इत्यादी सेवक उपस्थित होते.





