



🔹विजयसिंह पंडित यांचा आ. पवारांना टोला
✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.24फेब्रुवारी):-माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून भोजगाव येथील पूल बांधकामासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्याची माहिती मिळताच, केवळ श्रेय लाटण्यासाठी भाजपाच्या निष्क्रिय सम्राटांनी उपोषणाची नौटंकी केली. अशा नौटंकीला जनता भीक घालणार नाही, भोजगाव येथील पूल बांधकामासाठी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्याच पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाल्याची माहिती देताना विजयसिंह पंडित म्हणाले की , केवळ नौटंकी करुन विकासकामांचे श्रेय मिळत नसते, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात असा टोलाही विजायसिंह पंडित यांनी आ. पवार यांना लगावला.
गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील अमृता नदीचा पूल दोन वर्षांपूर्वी वाहून गेला, आजवर या कामाला मंजुरी मिळवण्यात आ. लक्ष्मण पवारांना यश आले नाही. निष्क्रिय आमदाराने या दोन वर्षात कधीही या कामाच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले नाहीत. माजी आमदार अमरसिंह पंडित आमदार असताना त्यांच्या प्रयत्नातून भोजगाव जोड रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यानंतरच्या काळात आ. पवार आणि बदामराव पंडित यांनी या रस्त्यावरील खड्ड्यात टोपलंभर डांबर देखील टाकले नाही. पुल ओलांडताना ग्रामस्थाच्या मृत्युनंतर माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी जिल्हा वार्षिक योजनेमधून या कामासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्याची मागणी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे केली. अमरसिंह पंडित यांच्या विनंतीवरून पालकमंत्र्यांनी जिल्हा वार्षिक योजनेमधून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, ही माहिती मिळताच निष्क्रिय आमदारांनी केवळ फुकटचे श्रेय लाटण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला. यापूर्वीच प्रशासकीय मान्यतेची कार्यालयीन प्रक्रिया सुरू असल्यामुळे आणि हे त्यांना माहिती असल्यामुळे उपोषण न करताच फुकटात पत्रकबाजी करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न आ. लक्ष्मण पवार करत असल्याची टीकाही विजयसिंह पंडित यांनी केली.
पुढे बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वाटप करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना असतात, याचे ज्ञान आमदारांना असतानाही त्यांनी केवळ फुकटचे श्रेय लाटून लोकांना वेड्यात काढू नये. जनता जनताजनार्धन असल्या सोंगाड्यांला भीक घालणार नाही. मागचे सात वर्षे केवळ पत्रकबाजी करून श्रेय लाटणाऱ्या या निष्क्रिय सम्राटांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे, त्यामुळे भोजगाव आणि परिसरातील ग्रामस्थ आ. लक्ष्मण पवार यांच्या भुलभुलैय्यांना भुलणार नाहीत असेही ते म्हणाले.
शेवटी विजयसिंह पंडित म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेतून पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आणि माजी आ. अमरसिंह पंडित यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेले काम जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातून लवकरच सुरु करण्यात येईल भोजगाव पुलाचे काम दर्जेदार व्हावे यासाठी नक्कीच प्रयत्न करू असेही त्यांनी शेवटी सांगितले.





