Home पुणे स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकरच्या ‘तू तेव्हा तशी’ चे पुण्यात चित्रीकरण

स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकरच्या ‘तू तेव्हा तशी’ चे पुण्यात चित्रीकरण

78

🔹20 मार्च पासून झी मराठीवर होणार प्रसारण

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.24फेब्रुवारी): -झी मराठीवरील तू तेव्हा तशी या आगामी मालिकेची अगदी पहिल्या झलक पासूनच प्रेक्षकांमध्ये चर्चा चालू आहे. या मालिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांना स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर हि जोडी पाहायला मिळणार आहे. तू तेव्हा तशी या मालिकेचे सध्या पुण्यात विविध ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे, यानिमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री शिल्पा तुळसकर,अभिज्ञा भावे,  दिग्दर्शक मंदार देवस्थळी, निर्माते संदीप जाधव यांच्यासह अभिनेते सुनील गोडबोले, किरण भालेराव, अभिषेक राहाळकर यांनी पुण्यातील मिडियाशी दिलखुलास संवाद साधला. 

अभिनेता स्वप्नील जोशी म्हणाला, झी मराठीशी माझे जून नाते आहे. पुन्हा एकदा मालिकेच्या माध्यमातून रसिकांना भेटायला येण्याचा आनंद वेगळा आहे. पहिल्या प्रेमाचं आपल्या आयुष्यात खूप खास स्थान असतं आणि त्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात आयुष्यभर साठलेल्या असतात. अशातही जर ते पहिलं प्रेम व्यक्त करायचं राहून गेलं असेल तर? अशाच अव्यक्त प्रेमाची गोष्ट म्हणजे तू तेव्हा तशी. ही मालिका प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास आहे. 

शिल्पा तुळसकर म्हणाली, “मेघ दाटले या मालिकेनंतर जवळपास २० वर्षांनंतर ‘तू तेव्हा तशी’मधून अनामिकाच्या प्रमुख भूमिकेतून मी प्रेक्षकांच्या भेटीला येतेय त्यामुळे खूप जास्त उत्सुकता आहे.  पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येताना खूप आनंद होतोय.  स्वप्नील सोबत खूप वेळानंतर पुन्हा एकदा काम करतेय त्यामुळे एकत्र काम करताना ऑन-स्क्रीन, ऑफस्क्रीन एक पॉझिटिव्ह एनर्जी कायम असते. या मालिकेचं कथानक खूपच वेगळं आणि सुंदर आहे. प्रेमाला वयाचं बंधन नसतं आणि या मालिकेतून ते सुंदररित्या मांडण्यात आलं आहे जे प्रेक्षकांना देखील आवडेल याची मला खात्री आहे.”

तू तेव्हा तशी या मालिकेबद्दल अभिज्ञा म्हणाली, “सो ऑफिशिअली मी तुम्हाला पुन्हा भेटायला येते आहे एका अशा भूमिकेत जी मला याआधी करायला मिळाली नाही.. मी आशा करते कि प्रेक्षकांकडून मला भरभरून प्रेम आणि पाठिंबा मिळेल, कारण माझी मेहनत १०० पटीने जास्त असणार आहे. अभिज्ञा कुठली व्यक्तिरेखा निभावणार हि माहिती अजून तरी गुलदस्त्यातच आहे पण तिची भूमिका प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकेल यात शंकाच नाही.

दिग्दर्शक मंदार देवस्थळी म्हणाले, आम्ही कायमच काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, चालू असलेल्या प्रेमाच्या अनेक गोष्टी सांगितल्या, राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट सुद्धा कदाचित आली असेल पण आम्ही ही गोष्ट नव्या पद्धतीने सांगतोय हे तू तेव्हा तशी चे वेगळेपण आहे. तू तेव्हा तशी या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि प्रेक्षकांची उत्सुकता द्विगुणित झाली. हि मालिका कधी भेटीस येणार याची आतुरता प्रेक्षकांना होती, त्याच उत्तर देखील मिळालं आहे. हि मालिका २० मार्च पासून रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here