Home बीड रखडलेल्या रस्त्याचा बळी; नाल्यात कार कोसळून चालकाचा मृत्यू, कुटुंबाचा एकमेव आधार हिरावला

रखडलेल्या रस्त्याचा बळी; नाल्यात कार कोसळून चालकाचा मृत्यू, कुटुंबाचा एकमेव आधार हिरावला

67

🔸महामार्गाच्या मुर्दाड अधिकाऱ्यांनो.. आणखी किती बळी घेणार?

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो’-9075913114

बीड(दि.23फेब्रुवारी):-शहरातून गेलेल्या राष्ट्रीय मार्गाच्या कामास होणारा विलंब नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. सोमवारी (दि.२१) रात्री १२ वाजता यशवंतराव चव्हाण चौकात पाण्याच्या टाकीजवळ महामार्गाच्या लगत अर्धवट काम सोडलेल्या नालीत कार कोसळून २२ वर्षीय तरूण चालक ठार झाला. चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या महामार्गाचे अधिकारी आणि गुत्तेदार यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी संतप्त नागरीकातून होत आहे.

निलेश मधुकर पवार (वय २२, रा. मोरेवाडी, अंबाजोगाई) असे त्या मृत चालकाचे नाव आहे. कार भाड्याने देण्याचा निलेशचा व्यवसाय होता. सोमवारी रात्री तो कारमध्ये (एमएच १२ एचएन १२९५) डीझेल भरून यशवंतराव चव्हाण चौकाकडून घराकडे निघाला होता.

तो पाण्याच्या टाकीजवळ आला असता रखडलेल्या महामार्गावर समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देताना त्याची कार रस्त्याच्या खाली उतरली आणि अर्धवट बांधून लोखंडी गज उघडे सोडलेल्या नालीत कोसळली. या अपघातात निलेश गंभीर जखमी झाला. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले, परंतु तिथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.

Previous articleश्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त युवा प्रोफेसर थामराज घोरसाड यांच्यामार्फत सुविधा शिबिर
Next articleजिल्ह्यातील शेतकर्‍यांचे अनुदान तात्काळ वाटप करा – जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here