Home महाराष्ट्र जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

82

✒️भास्कर फरकडे(तालुका प्रतिनिधी चामोर्शी)

गडचिरोली(दि.23फेब्रुवारी):- जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोशियन महाराष्ट्र राज्य कडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष राज्यस्तरीय पुरस्कार यावर्षी अतिदुर्गम व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केलेल्या विकासात्मक कामे, शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवणे, विविध शासकिय योजनेतून निधी आणून विकास कामे करणे, नेहमी आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वयातून जिल्ह्याचा विकास कसा करता येईल याबद्दल चर्चा करून विकासाचे आराखडा तयार करून ग्रामीण भागाचे विकास करणे अश्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार ठरले हे मात्र विशेष. राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय पुरस्कार 5 मार्च 2022 रोजी पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद व पंचयात समिती सदस्य असोशियन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कैलास गोरे पाटील यांनी दिले आहे..

Previous articleयुवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यारे आरोपी पोलीस ताब्यात
Next articleयुवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यारे आरोपी पोलीस ताब्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here