Home महाराष्ट्र चामोर्शी :- नादुरूस्त ट्रक देतोय अपघाताला आमंत्रण!

चामोर्शी :- नादुरूस्त ट्रक देतोय अपघाताला आमंत्रण!

72

✒️भास्कर फरकडे(तालुका प्रतिनिधी चामोर्शी)

आष्टी(दि.23फेब्रुवारी):- येथून तीन किमी अंतरावर असलेल्या मार्कंडा कंनसोबा येथील महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाच्या डेपोसगोर आष्टी आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावर आलापल्लीकडे जाताना उजव्या बाजुला रस्त्यालगत नादुरुस्त ट्रक उभा आहे. सुमारे एक वर्षांपासून हा ट्रक याठिकाणी असून या ट्रकमुळे अपघाताला आमंत्रण मिळत असल्याचे दिसून येते. सदर ट्रक गहामार्गालगत वर्षभरापासून उभा ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याठिकाणी पूर्णत: अंधार राहत असून ट्रकच्या समोर किंवा मागे काहीही सुचना दर्शक वस्तू ठेवण्यात आलेल्या नाहीत.

एगएच ३४ एबी ४९७१ असा रस्त्यालगत असलेल्या ट्रकचा क्रमांक आहे. सुमारे वर्षभरापासून नादुरुस्त अवस्थेत असलेला हा ट्रक कोणाच्या मालकीचा आहे? की चोरट्यांनी ट्रक येथे लपवून ठेवण्याच्या उद्देशाने उभा केला आहे, असे नानाविध प्रश्न नागरिकांतून व्यक्त केले जात आहेत. आष्टी ते आलापल्ली हा मार्ग अतिशय वर्दळीचा आहे. या मार्गावरून रात्रदिवस दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांचे आवागमन सुरू असते. रस्त्यालगत उभा असलेल्या सदर ट्रकमुळे विशेषकरून रात्रीच्या सुमारास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. परिवहन तथा पोलीस विभागाकडून सदर ट्रक हटविण्याची कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे……………

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here