



🔹मागासवर्गीय स्मशान भूमिची जमिन मालकी हक्कात सातबारा लावण्यासाठी आदेशित
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.22फेब्रुवारी):-सरकारी काम सालभर थांब या म्हणीप्रमाणे वर्षानुवर्ष झाले तरीही सरकारी काम होईलच आसे नाही पण गंगाखेड तालुक्यातील कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील जेव्हापासून गंगाखेड येथे रुजु झाले आहेत. तेव्हापासून शेतजमीन संदर्भात वेगवेगळ्या समस्या आहेत त्याचे निराकरण करून मार्ग काढण्याचे काम सध्या उपविभागीय अधिकारी कार्यालय गंगाखेड या ठिकाणी केले जात आहे.
गंगाखेड विधानसेभेचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करीत प्रशासकीय अधिकारी यांच्या बैठका घेत पांदन रस्त्यासह ,शेतजमिनिच्या वेगवेगळ्या समस्या मिटवण्याचा चंगच बादला असुन तो पुर्ण करण्याच्या दिशेने पाऊले उचलली जात आहे.गंगाखेड तालुक्यातील खंडाळी (रोकडोबा)या गावचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीचा प्रश्न होता तो मार्गी लागला. खंडाळी रोकडोबा येथील प्रतिष्ठित व्यक्ती मा. सिताराम माणिकराव भोसले यांच्या मालकीची असलेली सर्वे नंबर 221 मधील आठ(08) आर जमीन त्यांनी मागासवर्गीय स्मशानभूमी ला दान केली असून अधिनियम 1947 नियम 1959 नियम 8 (अ)मधील तरतुदीनुसार मौजे खंडाळी येथील आठ आर जमीन स्मशानभूमीसाठी दान करण्यात आली आहे 40 वर्षापासून ही जमीन आहे.
फेरफार नसल्याने मालकी हक्काचा सातबारा लावण्यात आला नव्हता परंतु उपविभागीय अधिकारी यांनी वैयक्तिक लक्ष देत नियम व अटी च्या सहाय्याने ही जमीन मागासवर्गीय स्मशानभूमी खंडाळी (रोकडोबा) यांच्या नावे करण्यासाठी आदेशित केले आहे ही जमीन मागासवर्गीय स्मशानभूमी च्या मालकी हक्कात देण्यात येणार असल्यामुळे खंडाळी रोकडोबा येथील गावकरी यांनी समाधान व्यक्त केले आहे. गंगाखेड तालुक्यामध्ये अशा प्रकारचा काही प्रश्न प्रलंबित असतील तर त्यांनी तात्काळ संबंधित तहसिलदार,तलाठी मंडळधिकारी यांना संपर्क साधुन आपल्याही गावचा प्रश्न मार्गी लावुन घ्यावा असे अहवान उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.





