



✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.22फेब्रुवारी):-क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील आत्मगिरी माध्यमिक विद्यालय म्हसवड येथील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी वैष्णवी हणमंत मासाळ हीने राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले .शैक्षणिक वर्ष २०२१ मध्ये राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा स्तर दोन ही परीक्षा देश पातळीवर घेण्यात आली होती.या परीक्षेला देशभरातून लाखो विध्यार्थी सहभाग घेतात व त्यातून दोन हजार विध्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती दिली जाते.राष्ट्रीय स्तरावर ही परीक्षा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद दिल्ली मार्फत आयोजित करण्यात आली होती.
या परीक्षेमध्ये सातारा जिल्ह्यातुन एकमेव कु. वैष्णवी मासाळ या विध्यार्थ्यांनीची देश पातळीवरील गुणवत्ता यादीत येण्याचा व शिष्यवृत्ती धारक होण्याचा बहुमान तिने मिळविला आहे.विशेष म्हणजे वैष्णवी चे वडील सामान्य शेतकरी व मेंढपाळ आहेत तर आई सामान्य गृहिणी आहे . वैष्णवी मासाळ हिला संस्थेच्या सचिव सुलोचना बाबर,मुख्याध्यापक अनिल माने यांनी मार्गदर्शन केले.या तिच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा.विश्वंभर बाबर, सातारा जि प माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे,उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे,पं स माणचे गटशिक्षणाधिकारी भरत चौगुले, विस्तारअधिकारी संगिता गायकवाड, केंद्रप्रमुख बाळासाहेब पवार तसेच क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील सर्व सहकाऱ्यांनी वैष्णवी मासाळ हिचे अभिनंदन केले.





