



🔹आमदार देवेंद्र भुयार यांनी राबविला अभिनव उपक्रम !
🔸ड्राइविंग लायसन्स शिबिराला हजारो नागरिकांचा प्रतिसाद !
✒️वरुड(पुरोगामी न्युज नेटवर्क)
मोर्शी(दि.22फेब्रुवारी):-विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांचे वतीने वाहन चालकांकरिता भव्य पर्मनंट ड्राइविंग लायसन्स शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक 21 ते 25 फेब्रुवारी सुरू राहणार आहे. सोमवार पासून सुरू झालेल्या या शिबिरात शेकडो वाहन चालक ड्राइविंग परीक्षा देत असून उत्तीर्ण होणाऱ्या चालकांना पर्मनंट लायसन्स वितरीत करण्यात येत आहे. मोर्शी मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी या शिबिराला हिरवी झेंडी दाखवून शिबिराची सुरुवात केली असून तालुक्यातील वाहन चालक मोठ्या संख्येत शिबिराचा लाभ घेत आहेत.
ग्रामीण भागातील नागरिक व युवकांना ड्रायव्हिंग लायसन्स बनविण्यासाठी आरटीओ कार्यालयात खेटे मारावे लागत होते. त्यातच एजंटगिरीने तर चक्रावून सोडले होते. पैशाचीही मागणी होत होती. तसेच आरटीओच्या ट्रॅकवर चाचणी द्यावी लागत होती.त्यासाठी नंबर येण्यासाठीही या एजंटांची खाबुगिरी
चालायची. यामुळे नागरिकांना सर्व कागदपत्रे असून
देखील मनस्ताप सहन करावा लागत होता. आता मात्र ही
सर्व दगदग कमी करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरुड तालुक्यामध्ये भव्य ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प चे आयोजन केल्यामुळे मोर्शी वरुड तालुक्यतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.या शिबिरामध्ये दुचाकी सह चार चाकी वाहनाचे ड्राइविंग टेस्ट घेण्यात येत असून दररोज अपॉईंटमेंट नुसार दिलेल्या वेळेत वाहन चालक नियमानुसार 8 व H ट्रॅक वर चाचणी देत आहेत. अत्यंत नाममात्र दारात वाहन चालक परवाना मिळत असल्याने नागरीकांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण आहे.
शिबिराकरिता अमरावती परिवहन विभागाचे अधिकारी नियोजित वेळेत उपस्थित होऊन संपूर्ण प्रक्रीया पार पाडत आहेत.या शिबिराकरिता आमदार देवेंद्र भुयार मित्रमंडळ, माजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष रोशन दारोकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळू कोहळे पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी, माजी सभापती निलेश मगर्दे, ऋषीकेश राऊत, अमित गांधी, रुपेश वाळके, संदीप खडसे, महेंद्र देशमुख, शिवदास भंडारी, तारेश देशमुख, बाळूभाऊ इंगळे, स्वप्नील आजनकार, आशिष श्रीराव, आकाश नागपुरे, यांच्यासह आदी मंडळी अथक परिश्रम घेत आहेत. तब्बल 5 दिवस शिबिर चालणार असल्याने या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले आहे


