Home महाराष्ट्र गेवराईत दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

गेवराईत दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

57

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.22फेब्रुवारीशहरात जुन्या बसस्थानकासमोर दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्‍या तरुणाचा मृत्‍यू झाला. अविनाश उर्फ बदाम गंगाधर जोंधळे (वय-१९, रा.ताकडगाव) असे त्‍याचे नाव आहे.

या घटनेसंबंधी सविस्तर माहिती अशी की, २१ फेब्रुवारी राेजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गेवराई शहरातील जुन्या बसस्थानकासमोर दुचाकींची समोरासमोर जोरादार धडक झाली. अविनाश उर्फ बदाम जोंधळे गंभीररित्या जखमी झाला. नागरिकांनी त्‍याला तातडीने गेवराई रूग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले. बीडला जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here