Home महाराष्ट्र प्रज्ञापर्व २०२२ च्या कार्यालयाचे उत्साहपूर्वक वातावरणात उद्घाटन!

प्रज्ञापर्व २०२२ च्या कार्यालयाचे उत्साहपूर्वक वातावरणात उद्घाटन!

96

🔹डॉ, बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती उत्सव .., मोठ्या उत्साहात साजरा करावा…!

🔸उपस्थित युवा कार्यकर्त्यांचा सूर!

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.22फेब्रुवारी):-डॉ, बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती उत्सव समिती कार्यालयाचे आज सर्व समाज बांधवांचे उपस्थित विधीवत उद्घाटन करण्यात आले.आज दिनांक, २१फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता वसंतराव नाईक चौक स्थित, स्पंदन हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या कॉम्प्लेक्स मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन, सामाजिक कार्यकर्ते, तथा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी , राजेश ढोले व ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते, भीमरावदादा कांबळे यांच्या हस्ते व सर्व समाज बांधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सामूहिक वंदना घेण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, प्रज्ञा पर्व माजी अध्यक्ष भीमराव दादा कांबळे, प्रज्ञापर्व २०२२चे नवनियुक्त अध्यक्ष, विठ्ठल खडसे सर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून,ऍड. यादवराव जांभूळकर, संतोष सुरवाडे सर, साहेबराव गुजर, आर पी गवई,. इत्यादी होते.या कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी, मागील दोन वर्षापासून, प्रज्ञापर्व जयंती उत्सव समिती, ही कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे शासनाच्या दिलेल्या नियमाचे पालन करून ऑनलाइन पद्धतीने साजरी करण्यात आली, परंतु या पुढील काळात हा जयंती उत्सव ऑफलाइन पद्धतीने अर्थात प्रबोधनात्मक सोहळ्याच्या माध्यमातून पूर्वीच्या पद्धतीने साजरा झाला पाहिजे अशी तीव्र इच्छा या उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी नवनियुक्त अध्यक्ष, विठ्ठल खडसे सर यांनी नूतन कार्य कारिनी या ठिकाणी जाहीर केली.उपस्थितांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन व स्वागत करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती उत्सव हा मोठ्या आनंदाने साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य व मदत करण्याचे आवाहन या नवनियुक्त कार्यकारणी च्या वतीने करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक भवरे सर यांनी तर आभार प्रदर्शन नरेंद्र पाटील सर यांनी केले.

या कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी, उपस्थिती, भीमराव दादा कांबळे, विठ्ठल खडसे , मिलिंद हट्टेकर, भगवान हनवते ,गणेश वाठोरे ,लक्ष्मण कांबळे, बुद्धरत्न भालेराव,सोनू वरठी , भीमराव उंद्रे ,आर .पी .गवई, साहेबराव गुजर, डॉ .राहुल भगत, मुन्ना हाटे संदीप कावळे,संतोष अंभोरे, सुरज हाडसे,ॲड .वाय. एम. जांभुळकर , हनुमान बेहडे ,वसंता इंगोले, प्रकाश खिल्लारे,प्रा. नितीन खाडे, संतोष सुरवाडे भगवान हनवते, कैलास श्रावणे, नरेंद्र पाटील इत्यादी मान्यवर व
या प्रसंगी बहुजन महापुरुष यांच्या विचारावर मार्गक्रमण करणाऱ्या सर्व संघटना ,राजकीय पक्ष तथा विविध संघटना चे पदाधिकारी तथा,कार्यकर्ते व समाज बांधव या कार्यक्रमास उपस्थित होते.

Previous articleलोकस्वराज्य आंदोलन व सम्यक विधार्थी आंदोलनाच्या वतीने तहशीलवर भव्य आक्रोश मोर्च्या
Next articleगेवराई तहसीलदारांच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here