



✒️शुद्धोधन बनसोडे(तालुका प्रतिनिधी,जिवती)मो:-7569482081
जिवती(दि.22फेब्रुवारी):-लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने ऍड .दत्तराज गायकवाड यांच्या नेतृत्वात तहशील कार्यालय जिवती येथे आक्रोश मोर्च्या काढण्यात आला .या मोर्च्याला सम्यक विधार्थी आंदोलन तालुका जिवती यांच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला होता .उमरखेड येथील बालरोगतज्ञ् डॉ .हनुमंत धर्मकारे यांची ११ जानेवारीला गोळ्या घालून हत्या करण्यात आली .या मारेकऱ्यांवर कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी या मुख्य मागणीसह मोर्च्या तहसील कार्यालयावर काढण्यात आला .महाराष्ट्रासह देशभरात लोकांवर अन्याय होत आहेत .हे होणारे अन्याय बंद व्हावेत व डॉ .धर्मकारेंच्या मुख्य मारेकऱ्यांचा शोध घ्यावा.या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.तसेच जिवती तालुक्यातील रस्त्याचे होत असलेले निष्कृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करून पक्के व मजबूत रस्त्याची निर्मिती करण्यात यावी .
तालुक्यातील शेतकऱ्यांचा जमिनीच्या पट्ट्याचा प्रश्न निकाली काढावा अश्या अनेक मागण्या ताशिलदारामार्फत शाशनाकडे मांडण्यात आल्या. हा आक्रोश मोर्च्या आंबेडकर भवन जिवती ते तहसील कार्यालय जिवती असा काढण्यात आला होता .मोर्च्यात बालाजी मोरे ,संभाजी ढगे ,जीवन तोगरे ,प्रशांत मोरे , अनिल मोटेराव,प्रेमकांत कांबळे , सुरज शिनगारे ,रोहन वाघवसे ,राहुल आक्रपे ,समेघ जिवने,विजय बनसोडे ,सुनील पैठणे ,समेघ जीवने ,चिरंजीव शिनगारे ,धीरज चिकटे ,प्रशिक कांबळे ,रजनीकांत वाघवसे ,असे तालुक्यातील शेकडो लोक व लोकस्वराज्य आंदोलनाचे पदाधिकारी सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे विध्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते .





