



🔸सिरसाळा पञकार संघाच्या वतीने शिवजयंती व मूकनायक दिन साजरा
✒️सिरसाळा प्रतिनिधी(अतुल बडे)
सिरसाळा(दि.22फेब्रुवारी):-देशात खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण करणारे छञपती शिवराय व भारतीय राज्य घटनेचे थोर शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती धर्मांना न्याय दिला असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांनी केले. ते सिरसाळा येथे शिवजयंती, मूकनायक दिन व बाळशास्त्री जांभेकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमात उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
सिरसाळा पञकार संघाच्या वतीने ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिरसाळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप एकशिंगे, प्रमुख वक्ते म्हणून अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे परळी तालुका कोषाध्यक्ष संजय सुरवसे, पञकार दताञ्य काळे, कल्पना अघाव आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना रानबा गायकवाड म्हणाले की, आमच्या समोर शिवराय मुस्लिम द्वेषी होते असा चुकीचा इतिहास मांडला गेला. वास्तविक शिवरायांच्या राज्यात सर्व प्रमुख पदावर मुस्लिम सेनापती होते. एवढेच नाही तर अठरा पगड जातीतील मावळ्यांना एकञ करून स्वराज्य स्थापन केले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही या देशातील बहुजनांना कायद्याने सर्व हक्क आणि अधिकार बहाल केले.
या प्रसंगी संजय सुरवसे, पो. उपनिरीक्षक प्रदीप एकशिंगे, पञकार दत्तात्रय काळे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमास परळी पंचायत समिती चे उपसभापती जानिमिया कुरेशी, खामगाव चे सरपंच श्रीराम बडे, चंद्रकांत कराड, वैजनाथ देशमुख, वंसत राठोड, बाळासाहेब पांडे, आय्युबभाई, प्रमोद किरवले, रोहिदास निर्मळ, नितीन निर्मळ, अनिल जाधव, डाॅ.प्रफुल्ल ललवाणी, सिद्धेश्वर कराड, रविंद्र आरसुळे, महम्मद इनामदार, आक्रम पठाण, बंडू शिंदे,नितीन कदम, मुंजा होनमणे, विजय पुरी,नामदेव गायकवाड, कैलास कावरे,राजू शेख, पांचाळ माम आदी सह अनेक जण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मिलिंद चोपडे, उपाध्यक्ष कुंडलीक लहाने, रमेश लहाने, सचिव जावेद पठाण, कोषाध्यक्ष अनिल देशमुख,डाॅ.जे.एन. शेख, डिगांबर देशमुख, आशोक गलांडे, बाळासाहेब गरड, बालाजी काळे, अतूल बडे, तुकाराम जाधव, धर्मा मेंडके यांनी प्रयत्न केले.
● यांचा झाला सन्मान :
येथील शासकीय, निमशासकीय अस्थापनेत कार्यकरणा-या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला, यात सिरसाळा ग्रामपंचायत चे कारकुन विश्वाभंर देशमुख, तलाठी सज्जाचे वंसत घनघाव,प्रा.आरोग्य केंद्राचे डाॅ. राधाकिसन राऊत, पोलीस स्टेशन चे बाबासाहेब किरवले, पोहनेर प्रा.आ.केंद्राचे डाॅ . राहूल शिंदे, डाॅ.सत्यप्रेम खाडे, जि.प.प्रा.शाळेचे शिक्षक लक्ष्मण वैराळ सर, ग्रा.प.चे आसेफ पठाण, पोलीस स्टेशन चे पो.काॅ.मिसाळ यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार व सन्मान सिरसाळा पत्रकार संघाच्या वतिने करण्यात आला आहे.





