Home महाराष्ट्र मांडवा येथील श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामास सढळ हाताने मदत करा

मांडवा येथील श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामास सढळ हाताने मदत करा

170

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.21फेब्रुवारी):- तालुक्यातील मांडवा येथे श्री .समर्थ नागोजी महाराज देवस्थान परिसरात भगवान श्रीकृष्ण यांच्या मंदिरांच्या बांधकामाचे भूमिपूजन दिनांक २ डिसेंबर २०२१ रोजी करण्यात आले.

गेल्या दोन ते अडीच वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण मंदिराच्या स्थापनेसाठी मांडवा येथे श्रीकृष्ण मित्र मंडळाची स्थापना करून प्रतिमहिना सदस्यांनी शंभर रुपये जमा करून एक लाख पस्तीस हजार रुपये जमा केले .व तसेच गावकऱ्यांच्या,तथा इतर भाविकांच्या सहकार्यातून भगवान श्रीकृष्ण मंदिर बांधकामाचा शिलाप पुर्ण झाला .व पुढील कामाबांधकामासाठी २ लाख रूपये खर्च येत आहे.

श्रीकृष्ण मंदिर बांधकामाकरिता भाविकांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन श्रीकृष्ण मित्र मंडळ मांडवाच्या वतीने तथा अध्यक्ष गणेश पुलाते यांनी केले आहे.संपर्कासाठी गणेश पुलाते ९८५०७२५६००,९६०४५६५६४४विनोद टेकाळे ८१८०९१९८१३,पवन राऊत ७३८५४१४८४८,सतिष चिरमाडे ७७०९४९०३०१,९३५६३६३२०९ दान देण्यासाठी यांच्याशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here