Home महाराष्ट्र स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येवला तहसीलदार साहेब यांना निवेदन

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येवला तहसीलदार साहेब यांना निवेदन

163

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.21फेब्रुवारी):- मनमाड नगर महामार्ग ते मुक्तीभुमी येवला कोर्ट नांदगाव बायपास या रस्त्याचे सुरू असलेले कामामुळे रस्त्याची उंची वाढणार असल्याने त्यावरून जाणाऱ्या मोठ्या वाहनांना तेथील वीज वितरणाच्या हाय टेन्शन 11/33 केव्ही व एल टी लाईनमुळे मुक्तीभूमीवर येणार्‍या पर्यटकांना होणारा धोका टाळण्या साठी आम्ही विनंतीपूर्वक निवेदन सादर करतो की देशातील अतिशय महत्त्वाचे ठिकाण म्हणून येवला मुक्तिभुमी कडे पाहिले जाते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1935 साली धर्मांतराची घोषणा केली म्हणून धर्मांतर घोषनेच्या वर्धापन दिनी देशातील लाखो भीमसैनिक मुक्ती भुमीवर येऊन अभिवादन करत असतात त्यांच बरोबर दररोज अनेक बाहेरचे लोक पर्यटक म्हणून मुक्ती भुमीला भेट देता परंतु मुक्तिभुमी कडील जाणाऱ्या येणाऱ्या बायपास रस्त्याचे काम सध्या सुरू असून सदर रस्त्याची उंची वाढलेली आहे.

आणि त्यामुळे रस्त्यावरून गेलेल्या महावितरण कंपनीची हाय टेन्शन 11/33 के.व्ही व एल टी लाईन गेली आहे सदर लाईन ची उंची ही रस्ता पासून खूपच जवळ असून त्यामुळे मोठा वाहनांना जाणे येणे शक्य नाही रात्रीच्या वेळेस बाहेरचे पर्यटक अचानकपणे मोठी वाहने घेऊन गेले तर अतिशय मोठा धोका व दुर्घटना होऊ शकते तसेच या मार्गाने येवला बाजार समिती मधील अनेक खरेदीदार व्यापाऱ्यांचे कांद्याचे व मक्याचे खळे आहेत त्यामुळे ट्रक कंटेनर तसेच मुक्तीभूमीवर जाणाऱ्या लक्झरी बसेस मोठ्या प्रमाणात जा ये करतात तसेच सदर रस्त्यालगत साठवण तलावातील पाणी भरून जाणारे पाण्याचे टँकर अशा अनेक मोठ्या मालवाहतूक साधने यांची वर्दळ होत असल्यामुळे येथील महावितरण कंपनीचे हाय टेन्शन एल.टी ची उंची वाढविणे अत्यंत गरजेचे आहेत. म्हणून साहेब निवेदनाचा सहानुभूती पूर्वक विचार करून तात्काळ आपण दखल घ्यावी अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल याची नोंद घ्यावी. निवेदन नायब तहसीलदार दाते साहेब यांनी स्विकारलेनिवेदनावर महेंद्रभाऊ पगारे (तालुकाध्यक्ष )विजय घोडेराव (ता.कार्याध्यक्ष)अजहरभाई शेख (शहराध्यक्ष)मोबीनभाई शेख( संघटक)संतोष गायकवाड यांच्या सह्या आहेत आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here