



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.21फेब्रुवारी):- जिल्ह्य़ातील वाळुमाफियांवर महसुल व पोलीस प्रशासनातील काही आधिकारी आर्थिक लाभातुन हितसंबंध जोपासत मेहेरबानी करतात, हे सगळ्या बीड जिल्ह्य़ातील सामाजिक कार्यकर्ते तसेच जनतेने पाहीले आहे, वाळुतस्करी प्रकरणात संबधित ब-याच हायवा गाड्या या महसुल व पोलीस प्रशासनातील तसेच स्थानिक राजकीय नेत्यांच्या मर्जीतील लोकांच्याच आहेत, तक्रार केल्यानंतर महसुल व पोलीस प्रशासनातील आधिका-यांचा भाव वधारतो अशाही चर्चेंना ऊधाण आल्याचे आपण पाहतो बीड, गेवराई, शिरूर (कासार )आदि तालुक्यातील प्रमुख नदीपात्रातील अवैध वाळु तसेच डोंगरपट्टयातील गायरान डोंगरातुन मुरूमाचे उत्खनन होत असते, तेव्हा महसुल व पोलीस प्रशासनातील आधिकारी मुग गिळुन गप्पच असतात.
ब-याच ठिकाणी महसुल व पोलीस प्रशासनातील आधिका-यांच्या साट्यालोट्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांचे जीव धोक्यात
_____
शिरूर कासार तालुक्यातील मौजे निमगांव (मायंबा)येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष शिरूर कासार यांनी नारायणवाडी शिवारातील सिंदफणा नदीपात्रातील अवैध उत्खनन प्रकरणात तक्रार केल्यानंतर वाळुमाफियांनी तलवार घेऊन त्याच्या घरात घुसन जीवघेणा हल्ला केला त्याप्रकरणात महसुल व पोलीस प्रशासनातील आधिका-यांनी काहीच भुमिका घेतली नाही केवळ गुन्हा दाखल केला आणि आरोपींच्या जामिनाची वाट पहात राहीले.त्यामुळेच महसुल व पोलीस प्रशासनातील आधिका-यांचे वाळुमाफियांसोबत साटेलोटे यास कारणीभूत आहे


