



✒️खामगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)
खामगांव(दि.21फेब्रुवारी):- येथील विस्डम एज्युकेशन्स, बालाजी मंदिर स्थित, जैन मंदिराजवळ, सराफा येथे *छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभाग घेतला. *विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमुख गुणांची जाणीव करून देणे* हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. आदरणीय डॉ. मुखीया सर आणि सक्रिय समाजसेवक, एकनिष्ठा रक्तसेवा-गौसेवा-रूग्णसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुरजभैय्या यादव यांच्या विशेष प्रेरकांच्या उपस्थितीने कार्यक्रम उत्साही झाला.
अनेक विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांवर आपले विचार, भाषणे, कविता, पोवाडे इ. सादर केले. या मध्ये कक्षा ९वी ची गौरी गाडगे द्वारे प्रस्तुत केलेल्या पोवाड्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले व धनवी जैन, महिमा व्यास, चिंतन सिसोदिया, अथर्व खंडेलवाल आणि वेद मकवाना या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांबद्दल आपले मनोगत व्यक्त करून सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमात सक्रिय समाजसेवक सूरजभैय्या यादव यांनी शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व कथन करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. त्यानंतर डॉ. मुखीया सर यांनी शिवाजी महाराजांचे गुण समजावून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. नंतर, विस्डम एज्युकेशन्स चे संचालक ज्ञानेश सेवक सर, यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी शिवाजी महाराजांच्या नैतिकतेचे आणि गुणांचे पालन करण्यास प्रवृत्त केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 9 वी च्या भाग्यश्री काकडने केले आणि खुशबू सेवक मॅडम यांनी सादर केलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचे समारोप करण्यात आले…


