Home महाराष्ट्र शिवजयंती नाचून नाही तर थोर शिवचरित्र्यवाचून आदर्श विचार मनात घेऊन साजरी..

शिवजयंती नाचून नाही तर थोर शिवचरित्र्यवाचून आदर्श विचार मनात घेऊन साजरी..

73

🔸खरकाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव थाटात

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.21फेब्रुवारी):-” छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती खरकाडा” च्या वतीने दरवर्षी प्रमाणे, ह्या वर्षी सुद्धा, शिवजयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,”कार्यक्रमाची सुरुवात 18 फेब्रुवारी सकाळी 7 वा .ग्रामस्वच्छता मोहीम पार पाडली , आणि 19 फेब्रुवारी सकाळी 9 वा.सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आलं, नंतर सकाळी 11 वा.रांगोळी स्पर्धा आणि दुपारी 3 वा. शिवजयंती साजरी करण्यात आली,व नंतर स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला, त्या कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराज आणि थोर महामानवांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून द्वीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

त्याठिकाणी सन्माननीय सर्व वक्ते आणि मार्गदर्शकांनी तसेच आथितींनी,हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवाचरित्र्य इतिहास याबाबद्दल विस्तृत मोलाचं त्यांच्या कार्याचा इतिहास आणि त्यांची हुशार नीती,त्यांचे ध्येय, विचार, परीश्रम, त्यांचे महान अविस्मरणीय कार्य लोकांसमोर जागृत केले ..,”कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सत्यावनजी सहारे सरपंच ग्रा. प. खरकाडा, उपाध्यक्ष:-मा.योगेश्वरजी ढोरे सेवा सो.अध्यक्ष कीन्ही , प्रमुख वक्ते:-मा. प्रा.पुष्पराजची पारधी सर एकलव्य महाविद्यालय नंदुरबार, मुख्य मार्गदर्शक:- मा.प्रा. लक्ष्मणजी मेश्राम सर संचालक इंस्पायर करिअर अकॅडमी ब्रम्हपुरी ,तसेचमुख्य अतिथी म्हणून मा.मुखरूजी पारधी साहेब माजी सरपंच खरकाडा, युवा मार्गदर्शक मा. खुशालजी ठाकरे महावितरण ऑपरेटर साहेब बीड, प्रमुख अतिथी ताराचंदजी पारधी उपसरपंच ग्रा. प. खरकाडा , प्रमुख अतिथी गण मा. ऋषीजी कुथे मा.सरपंच ग्रा. खरकाडा, प्रमुख मार्गदर्शक मा.श्री.भाष्करजी कुथे, मार्गदर्शक मनोजभाऊ मैंद , मा.श्री.तुकारामजी ठाकरे माजी उपसरपंच खरकाडा, प्रमुख पाहुणे:- खरवडे सर, मार्गदर्शक:- उत्तमजी बगमारे तं. मु . अध्यक्ष खरकाडा, प्रमुख अतिथी : खरकाडा कु. मा.प्रफुल ठाकरे सदस्य ग्रा.प.खरकाडा, विद्याताई प्रशांत ढोरेे , अमरजी बगमारे भाग्यश्रीताई किशोर शिवुरकर , आदी ग्रामपंचायत सदस्य ग्रा.खरकाडा हे उपस्तीत होते.

तर खरकाडा गावातील बहुसंख्य लोक त्याठिकाणी हजर होते या शिवजयंती कार्यक्रमाचे सूत्र संचालन देवानंद ठाकरे यांनी केलं तर आभार प्रदर्शन स्वप्नील उरकुडे यांनी केलं, आणि कार्यक्रम यशस्वीतेसाठी मा.श्री सोमनाथजी मैंद, कालिदास दिघोरे, देवानंद नागमोती,कैलाश दिघोरे, ,मोरेश्वर नागमोती,राधेश्याम ठाकरे, लंकेश दिघोरे ,राकेश पारधी, राकेश कुथे, मोरेश्वर नागमोती, जितेंद्र दिघोरे,वैभव मैंद,विक्की मैंद,अविनाश मैंद आणि आदी सर्व सदस्य यांनी खूप मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here