Home महाराष्ट्र सुरज दादा चव्हाण यांच्या वतीने नुतन नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षा यांचा सत्कार

सुरज दादा चव्हाण यांच्या वतीने नुतन नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षा यांचा सत्कार

46

✒️विषेश प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)

शिरूर अनंतपाळ(दि. 21फेब्रुवारी):-नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्ष यांच्या मध्ये अटीतटीची निवडणूक संपन्न झाली व शिरूर अनंतपाळ शहराच्या नगराध्यक्षा पदी सौ मायावती गणेश धुमाळे यांची निवड झाली तसेच उपनगराध्यक्षा पदी *सौ सुषमाताई बस्वराज मठपती* यांची निवड झाली त्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य *मा श्री सुरज दादा चव्हाण साहेब* यांनी नुतन नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षा यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या व भविष्यात शहराच्या विकास कामासाठी सर्व राजकीय द्वेष बाजूला ठेवून जे काही सहकार्य लागेल ते करण्याचा शब्द दिला व शिरूर अनंतपाळ शहराचा सर्वांगीण विकास सर्वांनी एकत्र येऊन करण्याची भावना व्यक्त केल्या.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते *मा अनिल भाऊ देवंगरे*, अर्थ व नियोजन सभापती *श्री संतोष ऊर्फ बाळू भाऊ शिवणे*, पोलिस निरीक्षक *श्री सुडके साहेब*, आदर्श सरपंच युवा नेते *श्री धनराज पाटील धामनगावकर*,माजी बांधकाम सभापती *श्री गणेश धुमाळे*, नगरसेवक *श्री संदिप शिवाजीराव बिराजदार*, युवा व्याख्याने *किरण कोरे*, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष *महादेव आवाळे*,युवा सामाजिक कार्यकर्ते *रतन शिवणे* सोमा भाऊ तोंडारे,आदि कार्यक्रर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here