



✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.21फेब्रुवारी):- दि.१९ फेब्रुवारी रोजी भारतीय मजदूर संघ १८वे अधिवेशन ऑडिटोरियम हॉल शक्तीनगर कॉलनी, दुर्गापूर चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले होते.अधिवेशनाचे उद्घाटन सौ.शिल्पा देशपांडे अध्यक्ष भा.म.संघ विदर्भ प्रदेश नागपूर यांच्या हस्ते भारत मातेचा फोटोला हार, द्विपप्रवलजन करून कार्यक्रम सुरुवात करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अशोक मांडवकर चंद्रपूर यांचा मार्गदर्शनात करण्यात आले.
प्रमुख उपस्थितीत श्री.रविंद्र हिमते राष्ट्रीय मंत्री, सौ.निताताई चौबे राष्ट्रीय उपाध्यक्ष, श्रीमान गटलेवार महामंत्री विदर्भ प्रदेश नागपूर,श्री.सुधीर घुरडे महामंत्री अ.भा.ख.म.संघ सदस्य, श्री.विवेक अल्लेवार उपाध्यक्ष प्रभारी जिल्हा चंद्रपूर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अशोक मांडवकर,प्रमुख उपस्थितीत श्री.रविंद्र हिमते राष्ट्रीय मंत्री, सौ.निताताई चौबे राष्ट्रीय उपाध्यक्ष, श्रीमान गटलेवार महामंत्री विदर्भ प्रदेश नागपूर,श्री.सुधीर घुरडे महामंत्री अ.भा.ख.म.संघ सदस्य, श्री.विवेक अल्लेवार उपाध्यक्ष प्रभारी जिल्हा चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात नवीन कार्यकारिणी निवडण्यात आले.
यावेळी नवीन कार्यकारिणीत जिल्हाध्यक्ष श्री. प्रमोद येलचलवार, कार्याध्यक्ष श्री.प्रफुल मत्ते,उपाध्यक्ष रूपेश सोमवार, उपाध्यक्ष सुरेश पाझारे, उपाध्यक्ष नंदु लेनगुरे, उपमंत्री प्रविण मुनगंटीवार, जिल्हामंत्री दिपक निंदेकर, सहमंत्री रमेश डांगे, तुषार राहूड, विनोद बारापात्रे,संघटनमंत्री आशिष पिंपळकर, प्रशांत कौरासे, कोषाध्यक्ष अजय खामनकर, विकास अडबायले, कार्यालयमंत्री संतोष भिवापूरकर,प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र लोनगाडगे ,महिला प्रमुख ममता राठोड कार्यकारिणीत सदस्य श्री.दामोदर मेघे,अशपाक शेख ,रमेश शेट्टी,शंकर विधाते,प्रविण राऊत, ज्योती ढोलने,गीता बोरकर, बंडू हिवरे,मारोती पिंपळशेंडे व निमंत्रित सदस्य श्री.प्रदीपकुमार वाचपेयी, अशोक मांडवकर, अनिल बंडीवार, देवराव निंदेकर, मनोहर साळवे यांची निवड करण्यात आली.या सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणी अंतिम तीन वर्ष पर्यंत वाटचालीकरिता यशस्वी ची भुभेच्छा देवुन व भारत माता की जय नारा देवुन अधिवेशन संपन्न करण्यात आला.


