Home महाराष्ट्र शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सेवा त्वरित सुरू करा -अध्यापकभारतीची मागणी

शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सेवा त्वरित सुरू करा -अध्यापकभारतीची मागणी

46

✒️येवला(पुरोगामी न्युज नेटवर्क)

येवला(दि.21फेब्रुवारी): – राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षांचे केंद्र विद्यार्थ्यांच्या शाळेतच देण्यात आली असली तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समोरील परीक्षा पेच अजूनही संपलेला नाही.एसटीचा संप गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरू असल्याने नियमित शाळा सुरू झाल्या असताना सुद्धा एसटी बस सेवा अनियमित सुरू आहे.त्यामुळे शाळेत परीक्षा केंद्रावर कसे जाणार असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे.राज्यातील ६५ ते ७० टक्के विद्यार्थी ग्रामीण,गांव-खेडे,तांडा वस्तीवर राहणारे विद्यार्थी असून सर्व प्रकारच्या अपुऱ्या साधन सुविधेमुळे विद्यार्थ्यांना शाळेत व पर्यायाने होऊ घातलेल्या परीक्षेत वेळेवर पोहोचायचे कसे याचा मोठा प्रश्‍न उभा ठाकला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षा ह्या ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे ठरवले आहे त्यानुसार तयारी अंतिम टप्प्यात आहे.बारावीच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा सुरू देखील झाल्या आहेत. बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च व दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च पासून सुरु होणार आहे.हजारो विद्यार्थी शिकत असलेल्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमधील परीक्षा केंद्र असणार असून देखील दळणवळणाची अपुरी साधन सुविधा परीक्षा केंद्रांची वाढलेली संख्या परीक्षा केंद्रावर वेळेत पोचण्याची समस्या अशा अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे.या सर्व गोष्टींचा मानसिक त्रास व बाल मनावर होणारा परिणाम ही गोष्ट पालक व शाळा यांच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची बाब आहे.राज्यात ऑक्टोबर महिन्यापासून एसटीचा संप सुरू आहे काही प्रमाणात एसटी गाड्या सुरू झाल्या असल्या तरी अजून पावेतो पूर्णक्षमतेने एसटी रस्त्यावर धावत नाही.

काही गावांमध्ये तर एकही गाडी धावली नाही.मुळात एसटी कडे असलेली बस गाड्यांची कमतरता हे त्यामागील मुख्य कारण असले तरी गेल्या पाच महिन्यापासून लांबलेला एसटीचा संप व त्यातून बस प्रवासी कामगार आणि विद्यार्थी नागरिकांची होणारी प्रवासातील तारांबळ ही अधिक क्लेशदायक बनले आहे. त्यातच परीक्षेची वेळ सांभाळून विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोचण्यासाठी कमालीची कसरत करावी लागत आहे लागणार आहे.दरम्यान ह्या कारणामुळे मुलींच्या दळणवळणाचा प्रश्न व प्रवासातील सुरक्षितता हा अधिक चिंतेचा विषय बनला आहे अनेक ठिकाणी रेल्वे रूळ-रेल्वे फाटक महामार्ग ओलांडून विद्यार्थ्यांना आपल्या शाळा-महाविद्यालय गाठावे लागते तेथेही मोठ्या प्रमाणात रहदारी व कधी रेल्वेचे फाटक बंद असणे यामुळे शाळा व परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आलेल्या आहेत.

राज्यात सध्या एसटीच्या पंधरा हजार गाड्यांपैकी साडेतीन ते पावणे चार हजार गाड्या धावत असल्याची माहिती आहे. अनेक गावात एसटीचा एक फेरा देखील होत नाही अशा वेळी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचायचे कसे ? असा प्रश्न आहे पालक व विद्यार्थी वर्गाकडून विचारला जात आहे. माध्यमिक शाळा काही गावाच्या जवळ असल्या तरी उच्च माध्यमिक शाळा या विद्यार्थ्यांना अधिक अंतरावर असल्याने तिथे पोहोचणे कमालीचे कठीण बनले आहे. ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना तालुक्याच्या किंवा शेजारच्या मोठ्या गावात शाळेत जावे लागते काही विद्यार्थ्यांचा प्रवास दीड तास दोन तास इतका वेळ खाऊ होतो व त्यातून परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जाण्याची भीती अध्यापकभारतीचे संस्थापक शरद विमल दिनकर (शेजवळसर) यांनी व्यक्त केली आहे.सध्या एसटीच्या संपामुळे विद्यार्थ्यांसाठी व नागरिकांसाठी हक्काच्या प्रवासाच्या साधनांची कमतरता आहे.दहावीच्या परीक्षेसाठी साधारण सोळा लाखहुन अधिक व बारावीच्या परीक्षेसाठी चवदा लाखाहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांना शाळा व परीक्षा केंद्रावर नियोजित वेळेत पोहोचण्यासाठी एसटी बस सेवा त्वरित सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे.

सन्मामनिय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग व परिवहन मंत्री यांनी ही बाब लक्षात घेऊन विनाविलंब विद्यार्थ्यांसाठी म्हणून तरी परीक्षा काळात स्वतंत्र व मोफत बस व्यवस्था सुरु करावी अशी मागणी राष्ट्रीय बालक विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षण प्रशिक्षण संस्था अध्यापकभारतीचे वतीने संस्थापक शरद शेजवळ यांनी महाराष्ट्र शासनाकडे निवेदना द्वारे केली आहे.पालक,विद्यार्थी, शिक्षक,शिक्षणसंस्था संघटनांनी व समाजातील जागृत नागरिकांनी सुद्धा या मागणीस मोठा पाठिंबा दर्शवत विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयकडे शासनाने त्वरित लक्ष देऊन विनाविलंब तात्काळ विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी बस सुरू करावी अशी मागणी अध्यापकभारतीचे संस्थापक शरद शेजवळ,अध्यक्ष विनोद पानसरे,नितीन केवट,कामिनी केवट,पालक प्रतिनिधी वनिता सरोदेभारती बागुल,शिक्षक प्रतिनिधी शैलेंद्र वाघ, सुभाष वाघेरे,नुमान शेख,सामाजिक कार्यकर्ते साथी संतोष बुरंगे,विद्यार्थी प्रतिनिधी अक्षय गांगुर्डे,अभय लोखंडे, प्रशिल शेजवळ,अक्षय गरुड,राजरत्न वाहुल शेख आदींनी पत्रकाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here